‘लोकवाङ्मय’चा छापखाना एप्रिलपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:01 AM2019-03-04T06:01:02+5:302019-03-04T06:01:06+5:30

प्रकाशन व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रभादेवी येथील लोकवाङ्मयगृहाचा छापखाना एप्रिल महिन्यापासून बंद होणार आहे.

The printing press of 'Lokvanya' will be closed from April | ‘लोकवाङ्मय’चा छापखाना एप्रिलपासून बंद

‘लोकवाङ्मय’चा छापखाना एप्रिलपासून बंद

Next

मुंबई : प्रकाशन व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रभादेवी येथील लोकवाङ्मयगृहाचा छापखाना एप्रिल महिन्यापासून बंद होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या छापखान्याला काम मिळत नसल्याने आर्थिक भार वाढत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक महिन्याची नोटीस देऊन हा छापखाना एप्रिल महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे.
शिवाय काही कामांची बिलेही थकल्यामुळे दुसऱ्या बाजूनेही नुकसान पदरी पडत आहे. अशा परिस्थितीत हा छापखाना सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे सर्व बाजू तपासून त्यानंतर हा छापखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी लोकवाङ्मयगृहाचे समूह व्यवस्थापक राजन बावडेकर यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून १२ कामगारांना कमी करण्यात येणार आहे. मात्र त्यांचे देणे पूर्णत: दिले जाईल. भविष्यात छापखान्यासाठी येणारे काम हे राज्यातील अन्य केंद्रात सोपविण्यात येणार आहे.

Web Title: The printing press of 'Lokvanya' will be closed from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.