Join us

प्राथमिक शिक्षणात नाट्यकलेला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 6:15 AM

‘पृथ्वी हा ग्रह वाचवायचा असेल; तर रंगभूमी वाचवा. त्यासाठी मुलांना प्राथमिक शिक्षणात अभिनयकलेला प्राधान्य द्या. तरच पुढची पिढी अधिक संवेदनशील असेल’

महेंद्र सुके  ठाणे : ‘पृथ्वी हा ग्रह वाचवायचा असेल; तर रंगभूमी वाचवा. त्यासाठी मुलांना प्राथमिक शिक्षणात अभिनयकलेला प्राधान्य द्या. तरच पुढची पिढी अधिक संवेदनशील असेल’, असा संदेश प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिल्लीच्या राष्टÑीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक राम गोपाल बजाज यांनी दिला असून, तो युनेस्कोने जागतिक रंगभूमीदिनानिमित्त जगभरात प्रसारित केला आहे.१९६२पासून युनेस्को दरवर्षी इंटरनॅशनल थिएटर इंस्टिट्यूटने आमंत्रित केलेल्या एका जगप्रसिद्ध रंगकर्मीचा रंगभूमीविषयक संदेश ‘जागतिक रंगभूमी दिवस आंतरराष्ट्रीय संदेश’ म्हणून प्रसारित करते. १९४८ साली स्थापन झालेल्या इंटरनॅशनल थिएटर इंस्टिट्यूटला ७०वर्षे झाल्याचे औचित्य साधून यावर्षी जगभरातील पाच नामवंत नाट्यकर्मींचे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत. त्यात भारतातून राम गोपाल बजाज, अरब देशांपैकी लेबनॉनमधील माया झबिब, युरोपमधून यू.के.तील सायमन मॅकबर्नी, अमेरिकेतून मेक्सिकोच्या सबिना बर्मन आणि आफ्रिकेच्या आयव्हरी कोस्टच्या वेरे वेरे लायकिंग या पाच जणांचे संदेश प्रसारित झाले आहेत.मुंबईत अनेक वर्षांपासून जागतिक रंगभूमी दिवसाचे निमित्त साधून, अवतरण अकादमी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आायोजन करते. या संस्थेचे प्रमुख, प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यप्रशिक्षक संभाजी सावंत इंटरनॅशनल थिएटर इंस्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या संदेशाचे मराठी भाषांतर करून, त्याचे वाचन करतात. बजाज यांनी जगाला दिलेल्या संदेशाचा त्यांनी मराठी अनुवाद केला असून, २८ मार्चला बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात त्याचे वाचन करणार आहेत.भारतीय नाट्यकर्मी राम गोपाल बजाज हे नाट्य दिग्दर्शक, नाट्य-चित्रपट अभिनेता, शिक्षणतज्ज्ञ आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक आहेत. त्यांनी मानवी जीवन, त्याचा विकास, निसर्गाशी असणारे नाते कलेशी जोडून समृद्ध रंगचिंतन मांडले आहे. ‘जिवंत नाट्यकलेला आणि तिच्या तंत्रांना, कृत्रिम ऐहिकता आणि क्रोध, लोभ, अभद्र यापासून मुक्त करून तिचे पुनर्शुद्धिकरण न केल्यास मानवी जीवन टिकणार नाही,’ असा धोक्याचा इशाराच त्यांनी जगाला दिला आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात अभिनयकलेच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आहे.भारतीय रंगभूमीचा हा दुसºयांदा गौरवइंटरनॅशनल थिएटर इंस्टिट्यूट १९६२पासून दरवर्षी एका रंगकर्मीचा संदेश जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जाहीर करते. या ५५ वर्षांच्या परंपरेत जगाला संदेश देणारे राम गापाल बजाज हे दुसरे भारतीय नाट्यकर्र्मी आहेत. २००२मध्ये प्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांचा संदेश प्रसिद्ध करण्यात आला होता, अशी माहिती रंगभूमीचे अभ्यासक संभाजी सावंत यांनी दिली.आता तरी शिक्षणखात्याचे डोळे उघडणार का?२०१६ मध्ये ठाण्यात झालेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलनात ‘शालेय शिक्षणात नाट्यविषयक अभ्यासक्रम हवा’ असा ठराव पारित केला होता. संमेलनाला दोन वर्षे उलटून गेली, तरी पुढे काहीही झाले नाही. आता बजाज यांनी दिलेला जागतिक संदेश तरी शिक्षणखाते गंभीरपणे घेणार आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.