विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या - गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:39 AM2017-08-13T03:39:23+5:302017-08-13T03:39:23+5:30

विद्यार्थ्यांच्या हातात देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे फक्त भाषण देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राध्यान्य द्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत.

 Prioritize students' questions - Goyal | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या - गोयल

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या - गोयल

Next

मुंबई : विद्यार्थ्यांच्या हातात देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे फक्त भाषण देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राध्यान्य द्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होईल, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल यांनी शनिवारी केले.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मल्हार फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी गोयल उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मल्हारच्या पहिल्या दिवशी मुंबईतील अनेक महाविद्यालयांतून हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
गोयल यांनी पुढे सांगितले, सध्या देशासमोर दहशदवाद आणि पर्यावरणातील बदल ही दोन मोठी आव्हाने आहेत. पर्यावरणातील बदलांचा दूरगामी परिणाम हा भावी पिढीवर होणार आहे. भावी पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त जग
सोडणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
मल्हारमध्ये ‘थिएटर आणि सिनेमा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये अभिनेता मकरंद देशपांडे, अभिनेत्री शबाना आझमी आणि होमी अदाजनिया सहभागी झाले होते. त्यांनी दोन क्षेत्रांतील बदल, वेगळेपणा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला; तसेच आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
देशात प्रगती होत आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता आली आहे, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. देशात अजूनही महिलांना त्यांचे हक्क दिले जात नाहीत. त्यांना कमी लेखले जाते. महिलांसमोर अशा अनेक समस्या आहेत. या विषयावर आॅल इंडिया प्रोगे्रसिव्ह वूमन्स असोसिएशनच्या सेक्रेटरी कविता क्रिशनन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पहिल्या दिवशी आर्ट जॉब, आॅल दीज ब्लूज या पेंटिंग, अल्बम आर्ट, इन्स्टॉलेशन आणि कल्पकता लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
होते. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते.

Web Title:  Prioritize students' questions - Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.