कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:18+5:302021-06-23T04:06:18+5:30

महावितरण; काॅल सेंटर २४ तास उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी लॉकडाऊनचे काही ...

Priority in maintaining power supply to Kovid Hospitals, Oxygen Generation Projects | कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य

कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य

Next

महावितरण; काॅल सेंटर २४ तास उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी लॉकडाऊनचे काही निर्बंध लागू आहेत. त्यामुळे काही नागरिक घरी असून, आवश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत आहेत. त्यात आता पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले असतानाच कोरोनामुळे कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तर शहरी, ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यासाठी वीज यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याची पूर्वतयारी म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. वीज यंत्रणेलगतच्या झाडाच्या फांद्या तोडणे, फुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांच्या ऑईल पातळीची तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहिन्यांचे तात्पुरती जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदलणे, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, जळालेल्या व तुटलेल्या वायर बदलणे, अशी अनेक कामे गतीने सुरू आहेत.

...तर पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश

वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करावा. यंत्रणा दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर करावे. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती वीजग्राहकांना द्यावी. अपघात टाळण्यासाठी दुरुस्ती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

- विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण

-----------------

Web Title: Priority in maintaining power supply to Kovid Hospitals, Oxygen Generation Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.