सोशल मीडियापेक्षा वाचनाला प्राधान्य!
By admin | Published: November 6, 2014 11:25 PM2014-11-06T23:25:36+5:302014-11-06T23:25:36+5:30
भारतीय वाचकांच्या वाचनाच्या सवयी जाणून घेण्यासाठी नुकतेच आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले
मुंबई : वाचन संस्कृती लयाला जात आहे, अशी एका बाजूला ओरड होत आहे. पण दुसऱ्या बाजूला नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून आजही देशातील ७४ टक्के लोकांनी सोशल मिडिया, इ-बुकपेक्षा छापिल पुस्तक वाचनला पसंती दर्शवली आहे. शिवाय, साहित्य विश्वाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, सर्वेक्षणाच्या माध्यमातून ६० टक्के व्यक्ती दर आठवड्याला एक पुस्तक वाचतात असा निष्कर्षही समोर आला आहे.
भारतीय वाचकांच्या वाचनाच्या सवयी जाणून घेण्यासाठी नुकतेच आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. वेगाने बदलत असलेल्या सध्याच्या जगात साहित्यिक वाचनावर होणारे तंत्रज्ञानाचे, सामाजिक व वागणूकविषयक प्रभाव जाणून घेण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. आधुनिक भारतीय वाचक कोणत्या प्रकारचे सहित्य वाचनाला पसंती दर्शवात.. या सर्वेक्षणात देशभरातील १ हजार ४२६ व्यक्तिंनी सहभाग घेतला. लेखकांना विशेष पसंती देण्याच्या बाबतीत सर्वच शहरांतील आणि वयोगटातील व्यक्तींनी पौराणिक
पुस्तके वाचण्यास अधिक रुची असल्याचे सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या टाटा लिटरेचर लाईव्ह फेस्टीव्हलच्या धर्तीवर
देशभरातील वाचनसंस्कृतीचा वेध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. (प्रतिनिधी)