तीन तासांसाठी आलेला कैदी महिनाभर क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:07 AM2020-06-09T01:07:20+5:302020-06-09T01:07:32+5:30
मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात गेली ३ वर्षे ठाणे कारागृहात असलेल्या कैद्याला वडिलांच्या अंत्यविधीसाठी अवघा तीन तासांचा जामीन मंजूर झाला. ...
मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात गेली ३ वर्षे ठाणे कारागृहात असलेल्या कैद्याला वडिलांच्या अंत्यविधीसाठी अवघा तीन तासांचा जामीन मंजूर झाला. त्यानंतर पुन्हा कारागृहात जाताना त्याची फरफट झाली आहे. क्वारंटाइनच्या नावाखाली महिना उलटूनही तो कैदी नवी मुंबईतील गोखले शाळा या तात्पुरत्या कारागृहात अडकला आहे.
आरे पोलीस ठाण्यात दाखल हत्येचा गुन्ह्यात अटकेत असलेला व्यंकटेश अरिमुगम चलैया (२२) २०१७ पासून ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या वडिलांचे ३ मे रोजी निधन झाले. वडिलांच्या अंत्यविधीसाठी त्याने जामिनासाठी अर्ज करताच दिंडोशी न्यायालयाकडून ५ तारखेला ३ तासांसाठी जामीन मंजूरही झाला. वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सशस्त्र पोलीस दल २ येथे २१ हजार २५८ रुपये जमा करून ८ पोलिसांच्या फौजफाट्यात व्यंकटेशला गोरेगाव स्मशानभूमीत नेण्यात आले. विधी उरकून व्यंकटेशला पोलिसांनी वेळेच्या आत पुन्हा ठाणे कारागृहाकडे नेले.
अखेर पोलीस पथकाने ६ मे रोजी त्याला पुन्हा दिंडोशी कोर्टात हजर करून घडलेला प्रकार कोर्टाला सांगितला. न्यायालयाने ठाणे कारागृहाच्या अधीक्षकाला नोटीस बाजावत व्यंकटेशच्या कोरोना तपासणीच्या सूचना दिल्या. न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी तेथून व्यंकटेशला पुन्हा जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेले. दोन दिवस ठेवल्यानंतर जे.जे. रुग्णालयातून त्याला तळोजा कारागृहाकडे नेण्यात आले. व्यंकटेशचा कोरोना चाचणी अहवालही निगेटिव्ह आला होता. त्याला कारागृहात थेट दाखल न करून घेता तेथून त्याला गोखले शाळेत म्हणजेच तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केले गेले.
तात्पुरत्या कारागृहात रवानगी
वडिलांच्या अंत्यविधीसाठी मिळाला होता जामीन