कैद्यांच्या पगारात होणार वाढ
By admin | Published: August 23, 2014 01:32 AM2014-08-23T01:32:32+5:302014-08-23T01:32:32+5:30
तुरुंगातील त्यांच्या मेहनत, मजुरीला आता चांगले दाम मिळणार असून सध्याच्या जवळपास दीडपट ही वाढ असणार आहे.
Next
जमीर काझी- मुंबई
राज्यभरातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या सुमारे 18 हजार कैद्यांसाठी एक खूशखबर आहे. तुरुंगातील त्यांच्या मेहनत, मजुरीला आता चांगले दाम मिळणार असून सध्याच्या जवळपास दीडपट ही वाढ असणार आहे. कैद्याच्या वर्गवारीनुसार रोजच्या पगारात सरासरी 15 ते 3क् रुपयांची वाढ करण्यात आली असून दर 3 वर्षानी त्यामध्ये 1क् टक्के वाढ केली जाणार आहे.
कैद्याचे वेतन निश्चित करण्यासाठी तुरुंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या समितीने गेल्या वर्षी वेतनवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. गृहविभागाने त्याला मान्यता दिली असून तातडीने नवीन दरवाढ लागू केली जाणार आहे. कुशल कैद्याला सध्या एका दिवसासाठी 4क् रुपये मिळतात, सुधारित प्रस्तावानुसार त्यामध्ये 15 रुपयांची वाढ केली आहे. तर खुल्या वसाहतीतील कैद्यांना सुधारित धोरणानुसार 7क् रुपये दिले जाणार असल्याचे अधिका:यांकडून सांगण्यात आले.
महागाईच्या तुलनेमध्ये कैद्यांना मिळणारा मेहनताना अत्यल्प असून त्यामध्ये सुधारणा करणो अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये बिहार, गुजरात व कर्नाटकातील कारागृहातील कैद्यांना जादा मजुरी दिली जात असल्याचे समितीने नमूद केले होते.
कैद्यांना कुवत व आवडीप्रमाणो काम दिले जाते. त्यांच्याकडून शेतीबरोबरच, मशरुम, बेकरी व हस्तकला, रंगकाम, सुतारकाम आदी उत्पादने बनविली जातात. या मजुरीच्या बदल्यात 4 वर्षांपासून राज्यातील कारागृहातील कैद्यांना एका दिवसासाठी कुशल कैद्याला 4क् रुपये तर अर्धकुशल व अकुशल कैद्यांना 35 व 25 रुपये मजुरी दिली जाते. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना एकत्रितपणो रक्कम मिळत होती. बोरवणकरांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणो विभागाचे अप्पर कामगार आयुक्त, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक, तुरुंग मुख्यालयाचे उपमहानिरीक्षक व कारागृह उद्योग विभाग अधीक्षकांचा सदस्य म्हणून समावेश होता.
राज्यात 43 लहान-मोठी कारागृहे असून त्यांची एकूण कैदी क्षमता 14,424 इतकी असताना त्या ठिकाणी 18,449 कैद्यांना ठेवण्यात आले आहे.