कैद्याची आत्महत्या : गुन्ह्यात गोवल्याच्या नैराश्यातून संपविले जीवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:58 AM2018-02-07T02:58:17+5:302018-02-07T02:58:40+5:30

मुंबई : ‘साहब मैंने कुछ नही किया है. मुझे फसाया गया है..’ असे म्हणत, गेल्या महिन्यात सबीरअली गरीबउल्ला शेखने (२६) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचे  शेखचे म्हणणे होते. याच नैराश्यातून त्याने सोमवारी कारागृहातच चादर फाडून तिच्या सहाय्याने गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

Prisoner's Suicide: Life ended by the disappointment of Goa! | कैद्याची आत्महत्या : गुन्ह्यात गोवल्याच्या नैराश्यातून संपविले जीवन!

कैद्याची आत्महत्या : गुन्ह्यात गोवल्याच्या नैराश्यातून संपविले जीवन!

Next
ठळक मुद्देचौकशी होणार

मनीषा म्हात्रे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘साहब मैंने कुछ नही किया है. मुझे फसाया गया है..’ असे म्हणत, गेल्या महिन्यात सबीरअली गरीबउल्ला शेखने (२६) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचे  शेखचे म्हणणे होते. याच नैराश्यातून त्याने सोमवारी कारागृहातच चादर फाडून तिच्या सहाय्याने गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या शेखचा नुकताच विवाह झाला होता. गावी भाऊ आणि पत्नीसोबत तो राहायचा. कामानिमित्त तो मुंबईत आला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एमआयडीसीतील वसीउल्ला शेख उर्फ रसगुल्ला (४0) या पोलीस खबर्‍याला नाशिक चोरी प्रकरणातली माहिती उघड केली, म्हणून ६ भंगार विक्रेत्या दलालांनी मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी शोहराबअली शहा (२५) आणि मोहब्बतअली शहा (२८) यांच्यासह साबिरअली याला अटक केली होती. साबीरअलीची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून तो येथे होता. 
त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यापासूनच, ‘मला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. मी काहीही केले नाही,’ असे म्हणत तो टाहो फोडत होता, तसेच त्याने यापूर्वीही ‘मला बाहेर काढा, नाहीतर मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी दिली होती. दर महिन्याला त्याचे नातेवाईक त्याला भेटायला येत होते. ३ महिने व्यवस्थित गेल्यानंतर अचानक शेखचे मानसिक संतुलन बिघडले. त्याची रवानगी कारागृहातील मानसिक रुग्णांच्या वॉर्डमध्ये करण्यात आली. तेथे तो आणखीनच खचला. त्यात अन्य कैद्यांकडून ‘अभी तुझे सजा होगी..’ असे चिडविणे त्याच्या नैराशेत भर घालत होते. 
जानेवारी महिन्यात त्याने चादरीच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही बाब तेथील अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वेळीच अडविले. त्याला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्याने आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले, म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिल्याचे आर्थर रोड कारागृह अधीक्षक हर्षद आहिरराव यांनी दिली. कुठलाही आरोपी आपल्यावरील गुन्हा कधीच कबूल करत नाही. त्यामुळे त्याचे समुपदेशन करण्यात आल्याचे आहिरराव यांनी सांगितले.

अधिक तपास सुरु
सोमवारी शेखने चादर फाडून गळफास घेतला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्ह्यात शेखचा सहभाग कितपत होता? त्याचे मानसिक संतुलन अचानक कसे बिघडले? त्याला खरेच या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते का? की, त्याला कारागृहात आणखी काही त्रास होता? ही माहिती सखोल चौकशीअंतीच समोर येणार आहे. या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Prisoner's Suicide: Life ended by the disappointment of Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.