sapna gill instagram model । मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मॉडेल सपना गिलचे (Sapna Gill) प्रकरण अद्याप चर्चेत आहे. मुंबईतील हॉटेल सहारा स्टारच्या बाहेर भारतीय क्रिकेटपटू आणि त्याच्या मित्रांना मारहाण (Prithvi Shaw selfie controversy) केल्याप्रकरणी सपना गिलने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, पृथ्वी शॉ प्रभावशाली लोकांशी संगनमत करत असल्याचा आरोप सपना गिलने केला असून तिच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, असे तिने म्हटले आहे. सपनाने आरोप केला की, तिला पृथ्वी शॉ चा मित्र असलेल्या तक्रारदाराने सध्याच्या एफआयआरमध्ये अडकवले आहे. याशिवाय सपना गिलवर गुन्हा नोंदवू नये, असे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी तिने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच तपास अधिकारी आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
4 जणांना झाली होती अटक याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सपना गिलसह चौघांना अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, आरोपींच्या चार दिवसांच्या कोठडीसाठी पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर गिल, तिचा मित्र शोभित ठाकूर आणि अन्य दोन रुद्र सोलंकी आणि साहिल सिंग यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर सपना गिल आणि इतर आरोपींनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. मग अंधेरी न्यायालयाच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.
खरं तर मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनने फेब्रुवारीमध्ये गिल आणि इतरांविरुद्ध शॉ यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी आणि त्यांच्या कारचे नुकसान केल्याप्रकरणी FIR नोंदवला होता. गिल आणि तिच्या मित्रांनी केलेल्या हल्ल्यानंतर, गिलवर शॉविरूद्ध खोटी तक्रार देऊन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आणि तक्रार मागे घेण्यासाठी 50 हजार रूपये मागितल्याचा आरोप करण्यात आला.
लक्षणीय बाब म्हणजे एफआयआरमध्ये सपना गिलवर भारतीय दंड संहिता अंतर्गत दंगल, खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 फेब्रुवारी रोजी तिला अटक करण्यात आली आणि 20 फेब्रुवारी रोजी मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर होईपर्यंत तिला कोठडीत ठेवले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"