कऱ्हाड (जि.सातारा) : शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत का? हे मला काही माहिती नाही; पण काँगे्रसचा एकही आमदार फुटणार नाही,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. रेठरे बुद्रुक (ता. कºहाड) येथे गुरुवारी यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी व कार्यगौरव सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, ‘भाजप- सेनेला सरकार स्थापन करण्याचा कौल जनतेने दिला आहे. उद्या सायंकाळपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे; पण राष्ट्रपती राजवट लागू न होता सरकार स्थापन होणं गरजेची बाब आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेबाबत शरद पवार यांच्याशी नेहमीच चर्चा होत राहते. सरकार स्थापनेबाबत परवा सोनिया गांधींना भेटून आलो आहे,’ अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.कोकणी माणसं भात काढणीत व्यस्त : पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी सातारा दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपताच ते कोकणात जाणार होते. मात्र, कोकणचा दौरा रद्द करून ते अचानक मुंबईकडे रवाना झाले. कोकण दौरा रद्द केल्याबाबत विचारले असता, कोकणातील लोक भात काढणीत व्यस्त आहेत. म्हणून मी दौरा रद्द केला, असे उत्तर पवार यांनी दिले.
काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 2:49 AM