मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, एकाचा मृत्यू-12 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 04:10 PM2017-10-20T16:10:25+5:302017-10-20T16:11:35+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरनजीक रामकुंड येथे खासगी प्रवासी बस उलटून अपघात झाला. या अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून मुंबईचे एकूण 12 प्रवासी जखमी झाले आहेत.
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरनजीक रामकुंड येथे खासगी प्रवासी बस उलटून अपघात झाला. या अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून मुंबईचे एकूण 12 प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडी नाईक कंपनीची आहे. ही गाडी मुंबईहून गोव्याकडे जात होती. गाडी उलटताना क्लिनर अफझल गाडीबाहेर फेकला गेला आणि गाडीखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात सुजल ठकरार (३६, मिरारोड), कविता समीर गुरव (३०, राजापूर), काव्य समीर गुरव (७, राजापूर), यश्वी समीर गुरव (४, राजापूर), मोहंमद असलम (३१, राजस्थान), शशांक चुबे (४५, दादर), शशिरा किशोर मालदे (३५, दहिसर), चिराग पंडग्या (३३, दहिसर), हर्ष हिमांशू बोरा (१४, घाटकोपर), शकुंतला आत्माराम शिवलकर (७३, कडवई) हे प्रवासी जखमी असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत अफझल हा अलिकडेच नोकरीत रुजू झाला असल्याने बसचालकालाही त्याच्याबद्दल अधिक काही माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.