एमपीएससी आंदोलनाला खासगी क्लासेसची फूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:32 AM2018-03-14T05:32:42+5:302018-03-14T05:32:42+5:30

सध्या सुरू असलेल्या एमपीएससीविरुद्धच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण दिसत असले तरी या आंदोलनाला खासगी क्लासेसची फूस असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.

Private clauses pallet for MPSC movement | एमपीएससी आंदोलनाला खासगी क्लासेसची फूस

एमपीएससी आंदोलनाला खासगी क्लासेसची फूस

Next

मुंबई : सध्या सुरू असलेल्या एमपीएससीविरुद्धच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण दिसत असले तरी या आंदोलनाला खासगी क्लासेसची फूस असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.
सरकारने दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केल्यानंतर सरकारने ३० टक्के कर्मचारी कपात करण्याचे धोरण राबविले आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. ते मुंबईला मोर्चा घेऊन आले आहेत. तेव्हा सरकारने याबाबत निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कर्मचाºयांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न येतो तेव्हा या काळात आढावा घेऊनच भरती केली जाते. त्यामुळे एमएपीएससीच्या जागांबाबत आढावा घेतला जात आहे. आघाडी सरकारच्या काळातही तेच करण्यात आले होते. आढावा घेणे म्हणजे कर्मचारी कपात असा अर्थ होत नाही. बेरोजगारीबाबत सरकार संवेदनशील आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक वर्षाऐवजी दर तीन महिन्यांनी बेरोजगारांबाबत आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
राज्य सरकारने कोणतीही कर्मचारी भरती प्रक्रिया थांबविलेली नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गृह विभाग, कृषी सेवक, कृषी अधिकारी, पाणीपुरवठा यातील कोणत्याही विभागाची भरती थांबवलेली नाही.

Web Title: Private clauses pallet for MPSC movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.