Join us

खासगी विकासकांनी थकवले म्हाडाचे सोळा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 6:23 AM

मेट्रो, झोपडपट्टी सुधार मंडळ, बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी तसेच खासगी विकासकांसाठी म्हाडाने संक्रमण शिबिराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई : खासगी विकासकांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचे भाडे वर्षानुवर्षे थकवल्याने हे भाडे आता १६ कोटींच्या घरात गेल्याची माहिती समोर आली आहे.

मेट्रो, झोपडपट्टी सुधार मंडळ, बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी तसेच खासगी विकासकांसाठी म्हाडाने संक्रमण शिबिराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र खासगी विकासकांनी या संक्रमण शिबिरांचे भाडे थकवले आहे. यामुळे ही कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची नामुश्की म्हाडावर आली आहे. मुंबईतील खासगी विकास प्रकल्पांसाठी विकासकांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचा वापर केला होता. यामध्ये शिवडी, लोअर परळ, चुनाभट्टी येथील संक्रमण शिबिरांतील गाळ्यांचा वापर विकासकांनी केला, मात्र भाडे दिलेले नाही.

म्हाडाने खाजगी विकासकांकडे थकबाकीच्या रकमेचा पाठपुरावा वारंवार केला. मात्र अनेक ठिकाणी अपयश आल्याने आता म्हाडाने कारवाईचे संकेत दिले. काही ठिकाणी मालमत्ता जप्त करण्यासाठीही म्हाडा प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी ही प्रकरणे निकाली काढत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची मदत घेण्यात येईल.प्राप्तिकर विभागाची घेणार मदतप्राप्तिकर विभागाची मदत घेऊन आगामी काळात या विकासकांच्या मालमत्ता कुठे आहेत याचा शोध घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.