सुशांतची खासगी डायरी उलगडणार आत्महत्येचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:12 AM2020-06-19T03:12:34+5:302020-06-19T07:10:07+5:30

पोलीस तपास सुरू; घरात चित्रपटाशी संबंधित कागदपत्रे सापडली

private diary might reveal reason behind sushant singh rajputs suicide | सुशांतची खासगी डायरी उलगडणार आत्महत्येचं रहस्य?

सुशांतची खासगी डायरी उलगडणार आत्महत्येचं रहस्य?

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या आत्महत्येची चौकशी सध्या वांद्रे पोलीस करत आहेत. त्याच्या खासगी डायऱ्या त्यांच्या हाती लागल्या असून यातून उचललेल्या आत्महत्येसारख्या टोकाच्या पावलामागचे कारण समजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशांतने मृत्यूपूर्वी सुसाइड नोट लिहिली होती का, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या घरी जाऊन घेतलेल्या झडतीत पोलिसांना काही खासगी डायºया सापडल्या आहेत. सुशांतला सतत काहीतरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवर तो नेहमी काही ना काही लिहीत असायचा. मृत्यूपूर्वीदेखील त्याने इन्स्टाग्रामवर काही पोस्ट करत नंतर त्या डिलिट केल्या. ज्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आता त्याच्या डायऱ्या पोलीस तपासून पाहत आहेत. त्यातून सुगावा हाती येतो का, हे पाहिले जात आहे. त्याच्या घरात चित्रपटाशी संबंधित कागदपत्रेदेखील पोलिसांना सापडल्याचे समजते, ज्यात सुशांतने कोणतीही भूमिका बजावलेली नसून यामागे काय कारण होते याची उकल पोलीस करत आहेत.

पोलिसांनी त्याचा लॅपटॉप आणि मोबाइल फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. त्याच्या फोनच्या सीडीआरमध्ये गेल्या दोन आठवड्यांत तो ज्यांच्या संपर्कात होता त्या सर्वांची चौकशी करून काहींचे जबाब पोलीस नोंदवत आहेत. बॉलीवूडमध्ये कोणाशी त्याचे वैमनस्य होते का, याचाही शोध घेतला जात आहे.

जीवे मारण्याची धमकी?
सुशांतने एका चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला ठार मारले जाईल, असे तो त्याच्या जवळच्या मैत्रिणीला म्हणाला होता.
त्यामुळे त्याला कोणी धमकावले होते का? त्याला कोणाची भीती वाटत होती? की ही भीती तो तणावग्रस्त असल्याने त्याला वाटत होती, या दिशेनेही तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: private diary might reveal reason behind sushant singh rajputs suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.