कंटेनमेंट झोनमधील खाजगी डॉक्टरांना मिळणार पीपीई किट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 06:34 PM2020-05-16T18:34:16+5:302020-05-16T18:34:44+5:30

रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हर आणि क्लिनर्स यांनाही मिळणार

Private doctors in the containment zone will get PPE kits | कंटेनमेंट झोनमधील खाजगी डॉक्टरांना मिळणार पीपीई किट्स

कंटेनमेंट झोनमधील खाजगी डॉक्टरांना मिळणार पीपीई किट्स

Next


मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता असलेला आलेख पाहता शहरातील खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या सुविधा चालू ठेवाव्यात असे निर्देश सरकारने दिले आहेत, मात्र जोपर्यंत आम्हालाही पीपीई कीट चे संरक्षण मिळत नाही तोपर्यंत या सुविधा सुरु न करण्याचा पवित्रा खाजगी डॉक्टरांनी घेतला. मुंबई महानगर पालिकेकडून हा तिढा सोडविण्यात आला असून आता वैद्यकीय सेवा सुरु ठेवणाऱ्या खाजगी डॉक्टरांना पीपीई किट्सचे संरक्षण मिळणार आहे. मात्र शहरातील कंटेन्टमेंट झोनजवळच्या आणि आतमधील खाजगी दवाखाने सुरु ठेवणाऱ्या डॉक्टर्स यांनाच ही सुविधा मिळणार आहे. याशिवाय रुग्णवाहीका चालक आणि क्लिनर यांनाही पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

या आदेशानूसार डॉक्टरांसोबत, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हर आणि क्लिनर्स यांनाही पीपीई किट्स मिळणार आहेत. या निर्णयामुळे कोरोना रुग्णांसाठी अधिक रुग्णवाहीका उपलब्ध होण्यात मदत मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी  मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. रुग्णवाहिका मिळण्यास उशीर लागल्याने काही रुग्णांचा मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याशिवाय पालिकेने कोविड रुग्णांसाठी बेस्टच्या ७२ मिनी बसेसचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे.  सर्व २४ वॉर्ड अधिकाऱ्याना अंधेरी स्पोर्ट कॉम्पेक्समधून १००० पीपीई किट्स उचलण्याचे निर्देश पालीका प्रशासनाने दिले आहेत. गरजेनूसार अधिक पीपीई किट्ससाठी मागणी नोंदवा, प्रत्येक आठवड्याला आवश्यकतेनुसार हे किट्स वाटण्यात येईल असही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  

अनेक भागांतून खाजगी दवाखाने व वैद्यकीय सेवा बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक खाजगी हॉस्पिटल्स कोरोनाच्या भीतीने रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असतात. संरक्षण किट्स नसल्यामुळे अनेक ड़ॉक्टरांनी संसर्ग होण्याच्या धाकाने दवाखाने, रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःसाठी स्न्राक्ष्ण संसाधनाची मागणी केली होती. या संदर्भात मुंबई महापालिका प्रशासनाने ही संरक्षण संसाधने देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title: Private doctors in the containment zone will get PPE kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.