कोरोना लढ्यातील खासगी डॉक्टरांनाही मिळावे विमा संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:25 PM2020-04-16T16:25:05+5:302020-04-16T16:25:31+5:30

खासगी डॉक्टरांना, पीपीई किट, वैद्यकीय उपकरणे यांच्यासोबतच विमा संरक्षण द्यावे...

Private doctors in Corona combat should also get insurance cover | कोरोना लढ्यातील खासगी डॉक्टरांनाही मिळावे विमा संरक्षण

कोरोना लढ्यातील खासगी डॉक्टरांनाही मिळावे विमा संरक्षण

Next

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, घरोघरी जाऊन चाचणी करणाऱ्या आणि 'कम्युनिटी क्लीनिक'च्या माध्यमातून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना, पीपीई किट, वैद्यकीय उपकरणे यांच्यासोबतच विमा संरक्षण द्यावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतानाच खासगी डाॅक्टरांना विमा सुरक्षा पुरविण्याची मागणी शेवाळे यांनी केली. कोरोना संकटामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आहे. या परिस्थितीत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मी माझ्या मतदारसंघातील खासगी डॉक्टरांना केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, 'इंडियन मेडिकल कौन्सिल', 'महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल' आणि अनेक स्थानिक डॉक्टर्स संघटनांनी 'कम्युनिटी क्लीनिक'च्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविली. तर अनेक खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून घरोघरी जाऊन नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत हे खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून, धारावी, अँटॉप हिल्स, चिता कॅम्प, एम पूर्व-पश्चिम, एफ आणि जी प्रभागांमध्ये कार्यरत आहेत.

कोरोनाबाबत कार्य करणाऱ्यांना विमा कवच देण्याची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण आहे. तथापि, कोरोना युद्धाचा सामना करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्यावे. विम्याबरोबरच खासगी डॉक्टरांना पीपीई किट आणि वैद्यकीय उपकरणे देण्याची मागणीही खासदार शेवाळे यांनी केली आहे.

-----------------------------

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून दहावकोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’साठी देण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखिल आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९'साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Private doctors in Corona combat should also get insurance cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.