मुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार्गे खासगी एक्स्प्रेस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:01 AM2020-01-22T07:01:59+5:302020-01-22T07:02:20+5:30

- कुलदीप घायवट मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेस धावली. या एक्स्प्रेसला प्रवाशांचा ...

Private Express will run via Mumbai-Shirdi via Pune | मुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार्गे खासगी एक्स्प्रेस धावणार

मुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार्गे खासगी एक्स्प्रेस धावणार

Next

- कुलदीप घायवट
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेस धावली. या एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील पहिली खासगी एक्स्प्रेस मुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार्गावर चालविण्याची योजना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) आखण्यात येत आहे.

भारतीय रेल्वेमध्ये खासगीकरण करणे सुरू आहे. यामध्ये १०० वेगवेगळ्या मार्गांवर १५० एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. देशातील पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस दिल्ली ते लखनऊ या दरम्यान ४ आॅक्टोबर, २०१९ रोजी धावली. त्यानंतर, पश्चिम रेल्वे मार्गावरून १७ जानेवारी रोजी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान खासगी तेजस एक्स्प्रेस धावली, तर आता मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई-शिर्डी व्हाया पुणेमार्गे एक्स्प्रेस धावणार आहे.

रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्याद्वारे मुंबई-शिर्डी व्हाया पुणेमार्गे धावणारी खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. मुंबई-शिर्डी व्हाया पुणेमार्गे धावणाऱ्या गाडीला तेजस एक्स्प्रेसचे डबे लावण्याची योजना सुरू आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तेजस एक्स्प्रेसचे डबे घेण्यात येतील. प्रवाशांचा प्रवास कमीतकमी पाच तासांचा करण्याचा प्रयत्न आहे. ही गाडी शिर्डी फास्ट पॅसेंजर आणि दादर ते साईनगर (शिर्डी) एक्स्प्रेस या एक्स्प्रेसच्या वेळेत धावण्याचे नियोजन आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी मुंबई ते शिर्डी असा प्रवास करू शकतील. यासह शिर्डीपुढे पुण्यालादेखील जाऊ शकतात, अशी योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी आणि पुणे येथील प्रवाशांसाठी ही गाडी सोइस्कर ठरेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. पुढील आर्थिक वर्षात ही गाडी प्रवाशांच्या सेवेत खुली करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
या सुविधा उपलब्ध
मुंबई-शिर्डी व्हाया पुणे गाडीत रेल्वे सुंदरी दिसेल. प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वाय-फाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, सीसीटीव्ही, स्वयंचलित खिडकीचा पडदा, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, बसण्यास आरामदायी जागा असेल.

प्रवाशांच्या वेळेची बचत

दादर ते साईनगर (शिर्डी) एक्स्प्रेस ३३१ किमी अंतर आहे. या मार्गावरून ही एक्स्प्रेस ५७ ते ६० किमी प्रति तासाने धावते. या गाडीला ६ थांबे असून, ५ तास ५० मिनिटे दादर ते साईनगर प्रवास होतो, तर दुसरी शिर्डी फास्ट पॅसेंजर ४५३ किमी अंतर आहे. या मार्गावरून ही गाडी ३८ ते ४० किमी प्रति तासाने धावते. या गाडीला २९ थांबे असून, १२ तासांत सीएसएमटी ते शिर्डी प्रवास होतो. मात्र, आता हा प्रवास कमीत कमी पाच तासांचा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा विश्वास आयआरसीटीसीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Private Express will run via Mumbai-Shirdi via Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.