खासगी जमिनींची ‘झाडा’झडती

By admin | Published: November 18, 2014 01:31 AM2014-11-18T01:31:56+5:302014-11-18T01:31:56+5:30

कचराकुंडी बनलेल्या खासगी मोकळ्या जमिनी स्वच्छता अभियानाला हरताळ फासत आहेत़ त्यामुळे दुकानदारांनंतर पालिकेने आता अशा मोकळ्या, आरक्षित भूखंडांकडे मोर्चा वळविला आहे़

Private Lands' tree-plantation | खासगी जमिनींची ‘झाडा’झडती

खासगी जमिनींची ‘झाडा’झडती

Next

शेफाली परब-पंडित, मुंबई
कचराकुंडी बनलेल्या खासगी मोकळ्या जमिनी स्वच्छता अभियानाला हरताळ फासत आहेत़ त्यामुळे दुकानदारांनंतर पालिकेने आता अशा मोकळ्या, आरक्षित भूखंडांकडे मोर्चा वळविला आहे़ त्यानुसार संबंधित जमीन मालकांना नोटीस पाठवून त्यांचा परिसर साफ करण्याची ताकीद देण्यात येत आहे़ मात्र हा कचरा उचलण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर खटला दाखल करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे़
केंद्र सरकारनेच स्वच्छता अभियान जाहीर केल्यामुळे पालिकेच्या सफाई मोहिमेला बळ मिळाले आहे़ त्यामुळे पालिकेने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या इमारती व नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक परिसराची सफाई हाती घेतली आहे़ मात्र खासगी, मोकळ्या जमिनीवर मालकांचे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी कचराकुंडीच तयार होत आहे़ या भूखंडांच्या स्वच्छतेसाठी पालिकेने जमीन मालकांना नोटीस काढण्यास सुरुवात केली आहे़

Web Title: Private Lands' tree-plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.