खासगी अनुदानितचे शिक्षकही घेऊ शकतात स्वेच्छानिवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:13 AM2019-11-21T03:13:23+5:302019-11-21T03:13:34+5:30

पालिका महासभेची मंजुरी; २० वर्षांची सेवा पूर्ण करणे बंधनकारक

Private subsidized teachers may also volunteer | खासगी अनुदानितचे शिक्षकही घेऊ शकतात स्वेच्छानिवृत्ती

खासगी अनुदानितचे शिक्षकही घेऊ शकतात स्वेच्छानिवृत्ती

Next

मुंबई : खासगी अनुदानित शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शाळांमध्ये २० वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे निवृत्त होता येणार आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची अट शिथिल करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली.

ठरावीक काळ नोकरी केल्यानंतर शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे निवृत्ती घेता येते. मात्र, खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी अशी तरतूद नव्हती. महापालिकेच्या सेवेतील सर्व कर्मचाºयांना आतापर्यंत ३० वर्षे नोकरी आणि वयाची ५३ वर्षे पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेता येत होती. ही अट शिथिल करून २० वर्षांच्या सेवेनंतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याची परवानगी आता देण्यात आली आहे.

महापौरांनी व्यक्त केले समाधान
मुंबईचे महापौर स्वत: शिक्षक असल्याने खासगी अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची त्यांना विनंती केली होती. त्यानुसार, गेले अडीच वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी या संदर्भातील प्रस्तावाला शिक्षण समितीत मंजुरी दिली, तर बुधवारी या प्रस्तावाला पालिका महासभेतही मंजुरी देण्यात आली आहे. मीदेखील एक शिक्षक असून महापौरपदाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी या शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

शिक्षक - ९,९०१,
शाळा - १,२७९, तुकड्या - १,८६७, शिक्षकेतर - ४११,
अर्धवेळ शिक्षक - ११.

महापालिका सेवेतील कर्मचाºयांना आतापर्यंत ३० वर्षे नोकरी आणि वयाची ५३ वर्षे पूर्ण केल्यावरच स्वेच्छानिवृत्ती घेता येत होती. ही अट शिथिल करीत २० वर्षांच्या सेवेनंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याची परवानगी आता देण्यात आली आहे.

Web Title: Private subsidized teachers may also volunteer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.