मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील अहमदाबाद-मुंबई खासगी तेजस एक्स्प्रेसला बुधवारी मुंबईस पोहोचण्यासाठी तब्बल १ तास २४ मिनिटांचा उशीर झाला. परिणामी, इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या नियमानुसार प्रवाशांना परतावा मिळणार आहे. या एक्स्प्रेसमध्ये ६३० प्रवासी करीत होते. त्यांना प्रत्येकी १०० रुपये नुकसानभरपाई मिळेल. दरम्यान, खासगी तेजस एक्स्प्रेसच्या विलंबाने अनेक प्रवाशांना पुढील प्रवासासाठी विमानतळ गाठण्यास उशीर झाल्याने त्यांचा विमान प्रवास रद्द झाला.पश्चिम रेल्वे मार्गावरील भार्इंदर ते दहिसर जलद मार्गावर बुधवारी दुपारी १२.१५ वाजता ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. दहिसर ते मीरा रोड येथील बिघाडाची दुरुस्ती दुपारी १२.३० वाजता तर, मीरा रोड ते भार्इंदर येथील बिघाडाची दुरुस्ती दुपारी १.३५ वाजता झाली. परिणामी, अहमदाबादहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी तेजस एक्स्प्रेससह इतर एक्स्प्रेसला विलंब झाला.पश्चिम रेल्वे मार्गावरून अहमदाबाद ते मुंबई १९ जानेवारीपासून खासगी तेजस एक्स्प्रेस सुरू झाली. खासगी तेजस एक्स्प्रेस अहमदाबादहून सकाळी ६.४० वाजता सुटते. ती मुंबई सेंट्रलला दुपारी १.१० वाजता पोहोचते. मात्र बुधवारी दुपारी २.३४ वाजता पोहोचली. एक्स्प्रेसमध्ये अहमदाबादहून सुटताना ८७९ प्रवासी प्रवास करीत होते. मात्र मुंबई सेंट्रलपर्यंत ६३० प्रवासी प्रवास करणारे होते. त्यामुळे त्यांना आयआरसीटीसीच्या नियमानुसार १०० रुपये परतावा मिळेल, अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, एक्स्प्रेसला उशीर झाल्याने काही प्रवाशांच्या मागणीनुसार तिला अंधेरी स्थानकावर २ मिनिटांचा थांबा देण्यात आला. या वेळी ३० ते ३५ प्रवासी अंधेरी स्थानकावर उतरले. पश्चिम रेल्वे मार्गावरील या बिघाडामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावत होत्या. डबल डेकर एक्स्प्रेसला १ तास ३० मिनिटे, उदयपूर-वांंद्रे एक्स्प्रेसला २८ मिनिटे आणि सयाजीनगर एक्स्प्रेसला १० मिनिटे उशीर झाला. तर, आठ लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.परतावा मिळण्याची पद्धत किचकटप्रवाशांनी आॅनलाइन तिकीट बुकिंग केले होते. त्यांना १०० रुपयांचा परतावा मिळण्यासाठी आयआरसीटीसीच्या अधिकाºयांना प्रवाशाचा पीएनआर क्रमांक व अत्यावश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यानंतर प्रवाशांच्या ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर मेसेज येईल.ईमेल आणि मेसेजद्वारे येणाºया क्रमांकाद्वारे नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर एक ते दोन दिवसांत नुकसानभरपाई म्हणून १०० रुपये मिळतील.
खासगी तेजस एक्स्प्रेसला दीड तासाचा उशीर, प्रवाशांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 7:12 AM