Join us

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दक्षिण मुंबईत अवजड वाहनांसहीत खासगी ट्रॅव्हल्सना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 8:46 AM

मेट्रोसह विविध प्रकल्पांमुळे सध्या मुंबईत वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहतूक प्रशासनाने दक्षिण मुंबईत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे ठरवले आहे.

मुंबई - मेट्रोसह विविध प्रकल्पांमुळे सध्या मुंबईवाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहतूक प्रशासनाने दक्षिण मुंबईत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे ठरवले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दक्षिण मुंबईत अवजड वाहनांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.शिवाय, खासगी बसगाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सकाळी 8 ते  11 वाजण्याच्या दरम्यान आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईत प्रवेश करण्यास आणि मुंबईतून बाहेर जाण्यास खासगी प्रवासी बसेसना परवानगी नसणार आहे.

मात्र, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या दूध टँकर, भाजीपाला, पाणी, पेट्रोल-डिझेल, रुग्णवाहिका यासारख्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. नव्या नियमांमुळे मुंबई सेंट्रल, दादर, लोअर परळ आणि परिसरातून खासगी ट्रॅव्हल्सने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण निर्माण होणार आहे. याशिवाय, अवजड वाहनांना प्रवासासाठी दक्षिण मुंबईत सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत हे निर्बंध लादण्यात आले आहेतच.

दरम्यान, अवजड वाहनांना एन.एम.जोशी मार्गावर (डिलाईल रोड) आर्थर रोड नाका,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील के. शांताराम पुजारे चौक, पी.डिमेलो रोडवरील मायलेट जंक्शन,  डॉ.अ‍ॅनी बेझंट रोडवरील सेंच्युरी मिल, सेनापती बापट मार्गावरील सर्व्हिस रोडवरील एल्फिन्स्टन जंक्शन, सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर प्रवेश बंदी मात्र राहील आणि बॅ.नाथ पै मार्ग, रे रोड आणि पी.डिमेलो मार्गावरून बाजूने रस्ते वापरून दक्षिण मुंबईत जाण्यास आणि दक्षिण मुंबईतील रस्त्यावर धावण्यास निर्बंध असतील. 

 

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी