लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्राकडून मिळणारा लसींचा साठा अपेक्षेपेक्षा कमी असल्याने खाजगी लसीकरण केंद्र बंद होऊ लागली आहेत. शुक्रवारी १३२ पैकी ५२ खाजगी आणि एका पालिका रुग्णालयात साठा संपल्यामुळे लसीकरण होऊ शकले नाही. तर १८ ठिकाणी कमी साठा असल्याने तिथेही लवकरच लसीकरण बंद होणार आहे. यामध्ये पालिका आणि सरकारी रुग्णालयांचाही समावेश आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येत असून काही ठिकाणी दोन पाळ्यांमध्ये लस दिली जात आहे. मात्र दर आठवड्याला किमान दहा लाख डोस येणे गरजेचे असताना मुंबईला जेमतेम एक ते दोन लाख डोस मिळत आहेत. त्यामुळे सरकारी आणि महापालिका केंद्रांवरच प्राधान्याने लस देण्यात येत आहे.शुक्रवारी दिवसभरात ४३ हजार १३७ नागरिकांना पहिला डोस तर पाच हजार १४३ लोकांना दुसरा डोस देण्यात आला. मात्र ७३ पैकी ५२ खाजगी केंद्रावर लसीकरण होऊ शकले नाही. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. मात्र लसींचा साठा मर्यादित असताना नवीन साठा लवकर उपलब्ध होत नसल्याने पालिकेची अडचण वाढली आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरणआरोग्य सेवक : २७२८४३फ्रंट लाईन वर्कर्स : ३१०८३४ज्येष्ठ नागरिक : ८४५०५४४५ वर्षांवरील : ७४७६४४एकूण : २१७६३७५शुक्रवारी झालेले लसीकरणमात्रा कोविशिल्ड कोवॅक्सीनपहिला डोस २२९२५ १२७९दुसरा डोस २०२१२ ३८६४