मुंबई : केंद्र सरकारने १०० दिवसांच्या कृती आराखड्यातून जास्त महसूल देणाऱ्या मेल, एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. देशातील रेल्वेचे कारखाने, वर्कशॉप, स्थानकांचे खासगीकरण करून सर्वांत जास्त नोकरी देणाºया भारतीय रेल्वेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (सीआरएमएस) गुरुवारी मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन केले.
‘रेल्वे नही बिकने देंगे हम, देश नही रुकने देंगे हम’ अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. रेल्वेला खासगीकरणाची वाळवी लागली आहे. ही खासगीकरणाची वाळवी रेल्वेला पोखरून काढून रेल्वे प्रवासी आणि कर्मचारी यांची पिळवणूक करणार आहे. सीएसएमटी स्थानकाचे सौंदर्यीकरण करून खासगी कंपन्यांच्या हातात स्थानक देण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी दिल्या होत्या. मात्र सीआरएमएसच्या वतीने रेल्वेमंत्र्यांचा हा डाव हाणून पाडण्यात आला. भायखळा येथील प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधातही संघाच्या वतीने आवाज उठविला जात राहणार आहे.रेल्वेमधील नोकºया झाल्या कमीभारतीय रेल्वे सर्वांत जास्त नोकºया देणारी संस्था आहे. मात्र अनेक वर्षांपासून रेल्वेमधील नोकऱ्यांना उतरती कळा लागली आहे. सरकारद्वारे कामगारविरोधी धोरणे आखण्यात आल्याने रेल्वे कर्मचाºयांची संख्या कमी होत आहे. रेल्वेची कामे ठेकेदारांना दिली जात आहेत, अशी भूमिका सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मांडण्यात आली. रेल्वेच्या प्रतिकिमीवर ३० पैसे प्रवास खर्च आहे. मात्र रेल्वेचे खासगीकरण झाल्यास हा खर्च अमाप पटींनी वाढण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी केला.