प्रियांका चोप्रा वर्षभरापूर्वी 'त्याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 16:32 IST2018-02-07T16:26:35+5:302018-02-07T16:32:24+5:30
बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आणि विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं लव्ह लाईफ बद्दल खुलासा केला आहे.

प्रियांका चोप्रा वर्षभरापूर्वी 'त्याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती, पण...
नवी दिल्ली - बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आणि विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं तिच्या लव्ह लाईफ बद्दल खुलासा केला आहे. देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सध्या चांगलीच स्थिरावली आहे. मालिकासह चित्रपट करण्यात ती व्यस्त आहे. हॉलिवूडमध्ये तिला भरपूर काम असतानाही ती बॉलिवूडला विसरली नाही. नुकतेच तिने फिल्मफेअरसाठी फोटोशूट केलं, त्यावेळी तिने मुलाखतही दिली. यावेळी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तिने मनमोकळेपणे आपल्या लव्ह लाईफ विषयी खुलासा केला. ती म्हणाली की, वर्षभरापूर्वी मी कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते. पण सध्या मी सिंगल आहे. मी खूप मोठ्या कालावधीनंतर सिंगल आहे. त्यामुळं माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि मला हे आवडत असल्याचे प्रियंकानं यावेळी सांगितले.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलखतीत प्रियंकानं तिचं रिलेशनशीप स्टेटस जाहीर केलं. आपण सध्या सिंगल असून, गेल्या वर्षीपर्यंत एका कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते. मी ढिगभर लोकांना भेटले. त्यांच्यासोबत बाहेर गेले. काहीजण माझ्या मागेही लागले होते. पण अजून माझं चित्त हरपलेलं नाही, असं प्रियंकाने मुलाखतीत सांगितले. ज्याच्यासोबत वर्षभरापूर्वी रिलेशनशिपमध्ये होती त्याच्याबद्दल तिला विचरण्यात आलं. त्यावेळी तिने आपल्या माजी प्रियकराचे नाव गुपितच ठेवलं. प्रियंका चोप्राचं नाव मागील काही दिवसांपूर्वी या फूटबॉलपटूसोबत जोडलं गेलं होतं.
2016 मध्ये एका मुलाखतीत प्रियंकाला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली होती जेव्हा माझ्या बोटात अंगठी दिसेल, जी मला देण्यात आली असेल, तेव्ही मी जगाला ओरडून सांगेन. तोपर्यंत कोणीच माझ्यावर हक्क सांगू शकत नाही.