Join us

अंकनाद पाढे स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:09 AM

मुंबई : राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडला. ...

मुंबई : राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडला. यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित या उपस्थित होत्या. शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था, तसेच मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यभरात २६ ऑगस्टपासून ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणी करण्यात येणाऱ्या कामगारांना ई-श्रमित कार्ड मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार होण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत नोंदणी करण्यात येत आहे. राज्यातील अंदाजे ३.६५ कोटी असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कामगार विकास आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांनी केले आहे.