लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृशीव टेकचंदानी या १९ वर्षीय गोल्फपटूने आतापर्यंत जिंकलेल्या विविध स्पर्धांतील बक्षिसाची रक्कम दान केली असून त्यातून चेंबूर येथील गोल्फ क्लबमधील सर्व कर्मचारी आणि आसपासच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल.
‘गाेल्फ क्लबमध्ये गवत कापणारे, सामान उचलणारे तसेच अन्य कर्मचारी सतत कार्यरत असतात. मी आज जे काही यश मिळवले आहे त्यात या सर्वांचा मोठा वाटा आहे. कोविड काळात माझ्या सहकाऱ्यांचे आयुष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला’, अशी भावना कृशीवने व्यक्त केली. कृशीवने भारताबरोबरच अबू धाबी, यु.ए.ई., सिंगापूर, स्कॉटलंड, इंग्लंड, अमेरिका देशातील गोल्फ स्पर्धेत यश मिळवले आहे. त्याच्या बक्षिसाची रक्कम लसीकरणासाठी देण्याच्या निर्णयामुळे क्लबमधील एकूण ३५० कर्मचारी तसेच ९५० सर्वसामान्य नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक लस मिळेल.
.................................