Join us

आवक नोंदीमध्ये घोटाळ्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 4:48 AM

भाजी मार्केटमधील प्रकार : चुकीच्या नोंदी दिल्याबद्दल नाराजी; बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान

नामदेव मोरेनवी मुंबई : बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये आवक नोंदीमध्ये घोटाळा सुरू आहे. कर चुकवेगिरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या नोंदी केल्या जात आहेत. आवकपेक्षा जास्त नोंद केलेल्या व्यापाºयांनी सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला आहे. व्यापाºयांची दफ्तर तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.

भाजी मार्केटमधील उपसचिव नामदेव गोपीचंद जाधव यांना ११ आॅक्टोबरला २५ हजार रुपये लाच घेताना अटक केली आहे. त्यांनी मार्केटमध्ये येणाºया मालाचा कर वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. या घटनेमुळे बाजार समितीमध्ये व्यापाºयांना कर चुकविण्यासाठी प्रशासनातील अधिकारी मदत करत असल्याची गोष्ट समोर आली होती. एपीएमसीच्या सर्वात कमी उत्पन्न मिळणाºया मार्केटमध्ये भाजीचा समावेश आहे. कांदा मार्केटमध्ये रोज सरासरी २०० गाड्यांची आवक होते. यानंतरही या मार्केटमधून वर्षाला ७ ते ९ कोटी रुपये उत्पन्न मिळते. फळ मार्केटमधून २५० ते ३०० गाड्यांची आवक होत असून, वर्षाला सात कोटी रुपयांचे उत्पन्न होते. भाजी मार्केटमध्ये रोज ६०० ते ७०० गाड्यांची आवक होत असून, दोन ते तीन कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळत असते. आवक प्रचंड होऊनही उत्पन्न कमी का? याचे कोडे अद्याप सुटलेले नाही. उपसचिवांना लाच घेताना झालेल्या अटकेनंतर मार्केटमध्ये कर चुकवेगिरीला मदत करणारे रॅकेट असल्याचे निदर्शनास आले होते. सोमवारी याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे. मार्केटमधील काही व्यापाºयांकडे आलेल्या आवकपेक्षा जास्त नोंद केल्याचा प्रकार निदर्शनास आला. आवक झाली नसताना जादा बाजार फी भरण्यास सांगितल्यामुळे संतापलेल्या व्यापाºयांनी समितीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. यामुळे काही वेळ कर्मचाºयांची भंबेरी उडाली होती. आम्ही तपासून पाहतो, आवक सुधारून देतो, असे आश्वासन देऊन या प्रसंगामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.भाजी मार्केटमधील आवक नोंदीमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये सर्वाधिक आवक होणारे काही व्यापारी कर्मचाºयांना हाताशी घेऊन नोंदीमध्ये बदल करत आहेत. यामुळे बाजार फीमध्ये बचत होत आहे. ज्यांच्याकडून महिन्याला पाच ते सहा लाख रुपये येणे आवश्यक आहे त्यांच्याकडून एक ते दोन लाख रुपयेच वसूल होत आहेत. अशा काही व्यापाºयांच्या नावाची यादी दक्ष कर्मचाºयांनी तयार केली आहे. त्यांच्या नावासह तक्रार पणन मंडळाकडे केली जाणार आहे. बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापाºयांची दफ्तर तपासणी करण्याची आवश्यकता आहे. या विषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी उपसचिव राजाराम दौंडकर यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.उत्पन्नवाढीसाठीप्रयत्न हवेतभाजी मार्केटमधील उपसचिवांना लाच घेताना अटक केल्यानंतर या मार्केटमध्ये डी. जी. माकोडे यांच्यासारख्या दक्ष अधिकाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत होती. माकोडे यांनी यापूर्वी फळ व मसाला मार्केटमधील कर चुकवेगिरीला आळा बसवून उत्पन्न वाढविले होते. यामुळे त्यांची तातडीने बदली भाजी मार्केटमध्ये केली होती; पण त्यांच्यावर हा अन्याय असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे बदली थांबविण्यात आली. सद्यस्थितीमध्ये राजाराम धोंडकर काम करत आहेत. धोंडकर हेही दक्ष अधिकारी असून, त्यांना वरिष्ठांनी बळ दिले व माकोडे यांच्या सारख्या अधिकाºयांचा फॉर्म्युला वापरल्यास उत्पन्नामध्ये मोठी वाढ होईल, अशी माहिती काही अधिकाºयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.बाजारातील आवक नोंदीकडे दुर्लक्षभाजी, कांदा व फळ मार्केटमध्ये आवक नोंद करण्यासाठी मापाडी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कामगारांनी काट्यावर उभे राहून वजनाची नोंद घेणे आवश्यक आहे; परंतु मापाडी कर्मचारी नियमित नोंद ठेवत नाहीत. भाजी मार्केटमध्ये काही गाळ्यांमधील तोलाईची नोंद रोज घेतली जाते. काही ठिकाणी आठवड्याने, काही ठिकाणी १५ दिवसांनी, तर काही जणांकडे एक महिन्यानेही नोंद केली जाते. यामुळे व्यापारी जे देतील त्या पद्धतीने नोंद ठेवली जात असून यामधून गैरव्यवहाराला चालना दिली जात आहे.कर्मचाºयांचा सहभाग असल्याचा संशयबाजार समितीमध्ये आवक नोंदीमधील गैरव्यवहारामध्ये कर्मचाºयांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेटवर काही जण आवकमधील काही गाड्यांची नोंद गायब करत आहेत. यामुळे गेटवरील केबिनमध्ये कॅमेरे बसविण्यात यावेत. सर्व व्यापाºयांचीदफ्तर तपासणी करून गैरव्यवहार होत आहेत का? याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :मुंबई