ब्रिजभूषण सिंहांवरील आरोपाची चौकशी करा, निलम गोऱ्हेंचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 10:10 PM2023-01-21T22:10:01+5:302023-01-21T22:10:21+5:30

जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍या सुमारे ३० भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत

Probe the allegation against Brijbhushan Singh, Neelam Gore's letter to Sports Minister | ब्रिजभूषण सिंहांवरील आरोपाची चौकशी करा, निलम गोऱ्हेंचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पत्र

ब्रिजभूषण सिंहांवरील आरोपाची चौकशी करा, निलम गोऱ्हेंचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पत्र

googlenewsNext

मुंबई - राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून भारतातील दिग्गज कुस्तीपटूंचेआंदोलन सुरू आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण आणि छळाचे आरोप केले आहेत. तसेच, हे सर्व आंदोलक कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून ब्रिजभूषण सिंह यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍या सुमारे ३० भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर दि. १८ जानेवारी, २०२३ रोजी निदर्शने देखील सुरू केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर पत्र पाठवले आहे. त्यात क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी  समिती स्थापन करून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे.

पत्रात काय केल्या मागण्या

केंद्रीय क्रीडा व राज्याच्या क्रीडा विभागात लैंगिक शोषणाच्या घटना थांबविण्यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात
महिला खेळाडूसाठी प्रत्येक ठिकाणी महिला प्रशिक्षकच नेमावेत, याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देशित करावे. 
प्रत्येक राज्याच्या स्तरावर एक समिती स्थापन करून क्रीडा प्रकारानुसार उपसमित्या स्थापन करून असे प्रकार राज्यात होणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही या सर्व सूचना लागू व्हाव्यात अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

७ सदस्यीय समिती स्थापन

दरम्यान, कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमधील वादात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मोठा निर्णय घेतला आहे. IOA ने WFI चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि 2 वकिलांचा समावेश आहे.
 

Web Title: Probe the allegation against Brijbhushan Singh, Neelam Gore's letter to Sports Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.