२ हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 06:13 AM2018-06-22T06:13:21+5:302018-06-22T06:13:21+5:30

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डसह दोन खासगी कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील तब्बल दोन हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करता येणार आहे.

Process for 2 thousand metric tons of plastic | २ हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया

२ हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया

Next

मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डसह दोन खासगी कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील तब्बल दोन हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करता येणार आहे. या उपक्रमात या दोन्ही कंपन्या निरुपयोगी प्लॅस्टिक गोळा करून त्यावर प्रक्रिया करणार आहेत.
मजबूत भविष्यासाठी पर्यावरण सुरक्षेशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याची माहिती डाबर कंपनीचे संचालन विभागाचे कार्यकारी निर्देशक शारुख खान यांनी दिली. खान म्हणाले की, येत्या आर्थिक वर्षात
दोन मेट्रिक टन प्लॅस्टिकचा कचरा राज्यभरातून गोळा करण्यात येणार आहे. गोळा करण्यात आलेल्या या प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाईल. हा कचरा गोळा करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही केली जाईल. प्लॅस्टिक कचºयापासून ऊर्जा आणि इंधन तयार केले जाईल. यातील इंधन सिमेंटच्या भट्टीत प्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे.

Web Title: Process for 2 thousand metric tons of plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.