मुंबई : औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी जाहिरात देण्यात यावी. नियमाप्रमाणे त्यांना सेवेत घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात नुकतेच बैठकीचे आयोजन केले हाेते. यावेळी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी हे निर्देश दिले.राज्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घ्यावे. करार पद्धतीच्या अंतर्गत मिळणारे मानधन द्यावे, कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती द्यावी. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये, यासाठी दहावी, तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परीक्षेसाठी प्रशिक्षण द्यावे किंवा त्यांच्या शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करावे, असेही निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले.दरम्यान, शेतकऱ्यांना चोवीस तास वीज हवी असल्यास व ते थकबाकी अर्धी भरून, नव्या दराने पुढील वीजदेयक भरण्यास तयार असल्यास त्यांना दिवसा वीजजोडणी द्या, असेही निर्देश देण्यात आले.
वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेस आता मिळणार गती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 6:04 AM