अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 06:15 AM2018-08-07T06:15:43+5:302018-08-07T06:15:57+5:30
अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी रविवारी तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केली.
मुंबई : अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी रविवारी तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केली. मात्र या वेळी एकाच जागेसाठी दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या रविवारी रात्री
यासंदर्भात तक्रारी गेल्यानंतर यात बदल करून सोमवारी सकाळी नवीन यादी जाहीर करण्यात आली. मात्र त्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना रात्री मिळालेल्या महाविद्यालयांपेक्षा वेगळे महाविद्यालय देण्यात आल्याने विद्यार्थी नाराज आहेत.
यंदा अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल ९३ हजार ६७२ जागा आहेत. या जागांवर राज्यभरातून तब्बल ५६८०६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पहिल्या कॅप फेरीत ४२ हजार ३३ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. रविवारी एकाच जागेवर दोघांना प्रवेश देण्यात आल्यानंतर सोमवारी यादी बदलण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय बदलल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
तब्बल ६३१ विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी सोमवारी सकाळी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयावर गर्दी केली व संचालकांना भेटण्याची मागणी केली. जवळपास ३ ते ४ तास विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ कार्यालयात पाहायला मिळाला.
डीटीईच्या कारभारावर आक्षेप नोंदवत प्रवेशद्वारावर पालक
आणि विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला युवा सेनेनेही पाठिंबा दर्शविल्याची माहिती युवा सेनेचे साईनाथ दुर्गे आणि महादेव जगताप यांनी दिली.
>गोंधळानंतर यादी बदलली
एकाच जागेवर दोन विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत प्रवेश देण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. यादीत झालेली चूक लक्षात आल्यानंतर यादी पुन्हा बदलली आहे. त्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी आवाहन केले आहे.
>कारवाई करावी
विद्यार्थ्यांना नाहक झालेला मनस्ताप पाहता आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणाºया फोर पिलर या कंपनीवर कारवाई करण्यात यावी.
- साईनाथ दुर्गे, युवासेना सदस्य