कृषी पर्यटन केंद्रे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:01+5:302021-05-31T04:06:01+5:30

नवीन ८६ कृषी पर्यटन केंद्रांचे अर्ज मंजूर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कृषी पर्यटनाशी संबंधित सर्व विभागांशी ...

The process of setting up agri-tourism centers is smooth | कृषी पर्यटन केंद्रे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरळीत

कृषी पर्यटन केंद्रे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरळीत

Next

नवीन ८६ कृषी पर्यटन केंद्रांचे अर्ज मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कृषी पर्यटनाशी संबंधित सर्व विभागांशी बातचीत सुरू आहे. लवकरच संबंधित विभागांकडून अध्यादेश जारी करून कृषी पर्यटन केंद्रे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, नुकतेच ८६ नवोदित कृषी पर्यटन केंद्रांचे अर्ज मंजूर केले आहेत, अशी माहिती शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी जागतिक कृषी पर्यटन परिषदेत दिली.

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विकास संस्था यांनी शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या सहकार्यातून ‘जागतिक कृषी पर्यटन परिषद २०२१’चे आभासी माध्यमाद्वारे आयोजन केले होते. यावर्षीच्या परिषदेत ‘कृषी पर्यटन - महिला शेतकरी उद्यमशीलता विकास’ या विषयावर चर्चा झाली.

सावळकर म्हणाले, कमीत कमी प्रशासकीय नियंत्रण ठेवून हे धोरण यशस्वीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. इच्छुक शेतकऱ्यांना आतिथ्य, विपणन इत्यादीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. त्या-त्या प्रांतातील एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र निवडून तेथे नोंदणीकृत अर्जदारांना प्रात्यक्षिक देण्यात येईल. पर्यटन विभागाच्या व्यवसाय प्रशिक्षण/मूल्यमापन सहलींमध्ये आदर्श कृषी पर्यटन केंद्रांना समाविष्ट करता येईल. या परिषदेमुळे प्रेरित होऊन शेतकरी व भगिनी कृषी पर्यटन केंद्रांसाठी नोंदणी करतील. शिवाय प्रसिद्ध पर्यटन स्थळे, जिथे किफायतशीर दरात निवास व्यवस्था मिळणे अवघड असते; अशाठिकाणी अथवा जिथे निवास व्यवस्था मिळणे दुरापास्त असते, अशा किल्ल्यांचे पायथे यासारख्या मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील कृषी पर्यटन केंद्रे चालू करणे जास्त लाभदायक ठरेल.

..........................................

Web Title: The process of setting up agri-tourism centers is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.