सोसायट्यांच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 07:16 AM2018-03-07T07:16:31+5:302018-03-07T07:16:31+5:30

ओल्या कच-यावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने वारंवार मुदत देऊनही अद्याप केवळ एक हजार सोसायट्यांनीच त्यावर अंमल केला आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे २ हजार ३०० सोसायट्यांना एका महिन्याची शेवटची संधी देण्यात येत आहे. त्यानंतर मात्र सरसकट सर्वांवर कारवाई होणार आहे.

 Process the waste in the premises of the Society! | सोसायट्यांच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करा!

सोसायट्यांच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करा!

googlenewsNext

मुंबई - ओल्या कच-यावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने वारंवार मुदत देऊनही अद्याप केवळ एक हजार सोसायट्यांनीच त्यावर अंमल केला आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे २ हजार ३०० सोसायट्यांना एका महिन्याची
शेवटची संधी देण्यात येत आहे. त्यानंतर मात्र सरसकट सर्वांवर कारवाई होणार आहे.
मुंबईत वाढणाºया कचºयाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवारातच ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे. मुंबईतील २० हजार चौ.मी.पेक्षा अधिक आकाराच्या व दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाºया सोसायट्यांचा कचरा २ आॅक्टोबर २०१६ पासून उचलणार नाही, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, या
निर्णयाला राजकीय नेते व नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर कारवाई मंदावली होती.
विविध कलमांतर्गत कारवाईचा धाक, पाणी व वीजपुरवठा बंद करण्याची ताकीद, अशा नोटिसांमुळे गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार
गृहनिर्माण सोसायट्यांनी यावर अंमल केला. उर्वरीत २ हजार ३०० सोसायट्यांना महिन्याभराची मुदत देण्यात आली असल्याचे सूत्रांकडून
समजते. याबाबत आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत आढावाही घेतला.

कचरा कमी झाला
२०१५ मध्ये दररोज सरासरी नऊ
हजार ५०० मेट्रिक टन एवढा कचरा
मुंबईतून उचलण्यात येत होता.
महापालिकेने कचरा कमी
करण्यासाठी राबविलेल्या
उपाययोजनांमुळे या कचºयाचे प्रमाण
आता दररोज सरासरी सात हजार
२०० मेट्रिक टनापर्यंत कमी झाले
आहे. याचाच अर्थ दररोज सरासरी
दोन हजार ३०० मेट्रिक टन एवढी घट
कचरा संकलनात झाली आहे.

मुंबई महापालिका अधिनियम, कलम ३६८ नुसार
करण्यात आलेली कारवाई : ३ हजार २८३ सोसायट्या,
आस्थापनांना नोटिसी देण्यात आल्या. यापैकी १ हजार
२६८ सोसायट्या/आस्थापनांकडून मुदत वाढविण्यासाठी
अर्ज प्राप्त झाले. ८१८ सोसायट्या, आस्थापना यांनी
अपेक्षित कार्यवाही पूर्ण केली, तर ७५४ च्या विरोधात
कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाहनसंख्येत घट : कचरा संकलनात घट झाल्यामुळे कचरा वाहून
नेणाºया वाहनांची संख्या जून २०१७च्या तुलनेत फेब्रुवारी
२०१८ मध्ये १२० वाहनांनी कमी झाली आहे. ही संख्या मे
२०१८ पर्यंत आणखी ८० वाहनांनी कमी होणे
अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या ही संख्या शहरात
७३३, पश्चिम उपनगरात ८५८ आणि पूर्व
उपनगरात ५२७ याप्रमाणे एकूण दोन हजार
११८ अशी आहे.

पाच हजारांपर्यंत दंड
मुंबई महापालिका अधिनियम
कलम-३६८ नुसार कचरा
व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
करणाºया सोसायट्यांना इतर
कारवाईबरोबरच अडीच
हजारांपासून पाच हजारांपर्यंत दंड
करण्यात येणार आहे.
पर्यावरण संरक्षण
कायद्यांतर्गत कारवाई
२२४ सोसायट्या, आस्थापनांना
नोटीस, २८ सोसायट्यांच्या
विरोधात कायदेशीर प्रक्रिया
सुरू करण्यात आली आहे.

Web Title:  Process the waste in the premises of the Society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई