रामनवमीसह महावीर व हनुमान जयंतीला मिरवणूक, भजनाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:06 AM2021-04-21T04:06:46+5:302021-04-21T04:06:46+5:30

* साधेपणाने घरीच उत्सव साजरे करा * गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

Procession on Mahavir and Hanuman Jayanti with Ram Navami, ban on bhajans | रामनवमीसह महावीर व हनुमान जयंतीला मिरवणूक, भजनाला बंदी

रामनवमीसह महावीर व हनुमान जयंतीला मिरवणूक, भजनाला बंदी

Next

* साधेपणाने घरीच उत्सव साजरे करा

* गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे बुधवारी साजरा होणारा श्रीरामनवमी उत्सव तसेच आगामी दिवसातील महावीर व हनुमान जयंतीला मिरवणूक, शोभायात्रा, मंदिरात भजन, कीर्तनाला बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी हे सण घरच्या घरी साजरे करावेत, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

बुधवारी रामनवमी, तर २५ तारखेला महावीर व २७ एप्रिलला हनुमान जयंती आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात सुरू असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाने निर्बंध जारी केले आहेत. खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता उत्सव व जयंती आपापल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावी, कोविड- १९चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजाअर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन. पठण इत्यादीचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाइन सुविधा, केवल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

Web Title: Procession on Mahavir and Hanuman Jayanti with Ram Navami, ban on bhajans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.