Join us

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासन आले धावून, १ हजार ५० पीपीई किटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:21 AM

पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर, इन्ट्युबेशन बॉक्स तयार केलेत.

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर, इन्ट्युबेशन बॉक्स तयार केलेत. आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ हजार ५० पीपीई किटची निर्मिती केली आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सुरक्षित राहणार आहे.पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाºयांनी एक हजार ५० पीपीई सूट तयार केले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार करताना सुरक्षितता बाळगण्यासाठी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने पीपीई किटची निर्मिती केली आहे. मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाºयांना किट देण्यात आले आहेत. या रुग्णालयात १७२ खाटांची सुविधा आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मापदंडानुसार आणि विशेष सूचनांद्वारे मंजूर केलेल्या कापडाने कठोर गुणवत्ता नियंत्रणाखाली लोअर परळ वर्कशॉपमधील कर्मचाºयांनी दररोज २०० ते २२५ सूट तयार केले आहेत.भारतीय रेल्वेने लोअर परळ वर्कशॉप आणि उत्पादन विभागांकडे वैद्यकीय कर्मचाºयांसाठी पीपीई सूट तयार करण्याचे काम सोपविले. वर्कशॉपच्या कर्मचाºयांनी सर्वोत्तम सुरुवात करून वैद्यकीय कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी बुटासाठी सुरक्षा कव्हरसह एक हजार ५० पीपीई सूट तयार केले आहेत. त्यामुळे जगजीवनराम रुग्णालयामध्ये ८०हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत असलेल्या वैद्यकीय टीमसाठी पीपीई सूट महत्त्वाचे ठरले आहेत.>मध्य रेल्वे २५ हजार पीपीई किट बनवणारभारतीय रेल्वे तयार करत असलेल्या १.५ लाख पीपीई किटपैकी मध्य रेल्वे २५ हजार पीपीई किट तयार करणार आहे. प्रत्येक बनवलेल्या कवरआॅलसाठी रेल्वेला जीएसटीसह ४२२ रुपये खर्च येईल. तर बाजारात हेच ८०८.५० रुपयांत उपलब्ध आहे. मध्य रेल्वे स्वत: संपूर्णपणे पीपीई बनवित असल्यामुळे मोठा फायदा होईल़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या