Join us

पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी चॉकलेट गणपतीची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:03 PM

दुधात विसर्जन, विसर्जनानंतर प्रसाद म्हणून वाटप

 

मुंबई : पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणाऱ्या पर्यावरण पूरक गणेशमुर्तींना पर्यावरण प्रेमींकडून चांगली मागणी असते. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर देखील सावट आलेले असताना पर्यावरण पूरक गणपती मुर्ती बनवण्यास   मागणी वाढू लागली आहे.  याचाच एक भाग म्हणून चॉकलेट पासून गणेशमुर्ती बनवण्यात येत आहे. घरोघरी अशा प्रकारे गणेश मुर्ती बनवण्यात याव्यात यासाठी विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

चॉकलेट पासून बनवण्यात येणाऱ्या या गणेश मुर्तीचे विसर्जन पाण्याऐवजी दुधात करण्यात येते व दुधात विरघळलेले चॉकलेट प्रसाद म्हणून भाविकांना व गरीब बालकांना देण्यात येते. हा प्रयोग करणाऱ्या रिंटू राठोड यांनी यंदा घरी चॉकलेटचा गणपती बनवण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन वर्कशॉप सुरु करण्याचा मनोदय जाहील केला आहे. गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर हे वर्कशॉप घेण्यात येणार आहे. 

सध्या कोरोनामुळे जग बदललेले असल्याने गणपतीच्या भक्तीचा प्रकार देखील बदलत आहे असे राठोड यांचे म्हणणे आहे. यंदा भाविकांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटची गणेश मुर्ती घरी तयार करावी व विसर्जन देखील घरीच करुन कोरोना कालावधीतील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन स्वत: सोबत इतरांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन राठोड यांनी केले आहे. जगभरातील ३२ देशांतील १६०० जणांनी यामध्ये उत्सुकता दर्शवली असून विनामूल्य ऑनलाईन वर्कशॉपसाठी नोंदणी केल्याची माहिती राठोड यांनी दिली.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईमहाराष्ट्रलॉकडाऊन अनलॉक