मुंबई : भारतात येणारे परदेशी पर्यटक, तसेच देशांतर्गत पर्यटक मोठ्या प्रमाणात गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देत असतात. त्यांच्यासमोर पश्चिम क्षेत्रातील चार राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सांस्कृतिक वारशांचे सादरीकरण केल्यास या भागातील कला कौशल्यांच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर पोहोचवणे सोपे जाईल, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
शनिवारी उदयपूर येथे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली. तेव्हा समिती सदस्यांच्या अनुमोदनानुसार गेट वे ऑफ इंडिया येथे दर आठवड्यात शनिवार, रविवारी सहा सदस्य राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची कायमस्वरूपी योजना आखण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे इतर अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य त्यांना मदत करणार आहेत. प
पंढरपुरात भक्ती संस्कृती संमेलन !राज्यातील वारकरी संप्रदाय आणि भक्ती संस्कृतीची माहिती देशातील इतर राज्यांना व्हावी, या करिता पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कार्तिकी वारीच्या काळात पंढरपुरात राष्ट्रीय भक्ती संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम क्षेत्रातील भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे संमेलन, कलाकारांसोबत थेट चर्चा करून सांस्कृतिक क्षेत्रासंबंधी त्यांच्या सूचना समजून घेतल्या जाणारा आहेत.