Join us

उस्मानाबादच्या मातीतून कलेची ‘प्रगती’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 1:55 AM

उस्मानाबाद येथे होणाºया नाट्यचळवळीतून रंगभूमीचा ध्यास घेतलेली. ही युवती कलाक्षेत्राने झपाटली गेली. पण आयुष्यात स्थिरता असायला हवी, या हेतूने तिने थेट अमेरिका गाठली.

राज चिंचणकर मुंबई : उस्मानाबाद येथे होणाºया नाट्यचळवळीतून रंगभूमीचा ध्यास घेतलेली. ही युवती कलाक्षेत्राने झपाटली गेली. पण आयुष्यात स्थिरता असायला हवी, या हेतूने तिने थेट अमेरिका गाठली. तिथे तब्बल १४ वर्षे आयटी क्षेत्रात तिने काम केले. पण अंगातली कला स्वस्थ बसू देत नसल्याने ती पुन्हा भारतात आली आणि तिने आता कलेच्या माध्यमातून गावच्या मातीचे ऋण फेडले आहेत.कलाक्षेत्रात काहीतरी करून दाखविण्यासाठी तिने प्रथम लेखणी हाती धरली. इतक्या वर्षांच्या प्रवासात जे काही अनुभवले ते तिने पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. तिची आत्तापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी चार पुस्तके ही प्रख्यात ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहेत. यातून तिला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने एखादा सामाजिक विषय मोठ्या व्यासपीठावरून हाताळावा, अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली आणि त्यातून ‘पल्याडवासी’ ही चित्रकृती तिने निर्माण केली.विशेष म्हणजे, ज्या उस्मानाबादमध्ये ती वाढली; त्या मातीचे मोल जाणून तिने उस्मानाबादमधील पारधी समाजाच्या जीवनावर यात भाष्य केले आहे.या समाजाला न्याय देण्याचा धीरगंभीर प्रयत्न तिने यातून केला आहे. विषयाला वेगळे वळण लागू नये, याची खबरदारी घेण्यासाठी तिनेच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अमेरिका, लंडन, कॅनडा, युरोप, व्हेनेझुएला, सिंगापूर, लंडन, बर्लिन, रशिया आणि भारत इथल्या विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत तिच्या या चित्रकृतीची दखल घेतली गेली आहे. तब्बल २७ पुरस्कार तिने पटकावले आहेत.