Join us

अनिवासी भारतीयांमुळेही देशाची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:37 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनिवासी भारतीयांचेदेखील देशाच्या विकासात योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य विसरता येणार नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अनिवासी भारतीयांचेदेखील देशाच्या विकासात योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य विसरता येणार नाही. तसेच त्यांच्या सन्मानार्थ ९ जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो, ही गौरवाची बाब आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत व्यक्त केले.

जगभरात ३.६ कोटी इतके अनिवासी भारतीय वेगळ्या देशांमध्ये विखुरलेले आहेत, तसेच त्यांच्यापैकी कायमचा वारसा तर अत्यंत प्रभावी आहे. यात प्रमुख म्हणजे अमेरिकेच्या कमला हॅरीस, युकेचे वित्त मंत्री, कॅनडाचे संरक्षण मंत्री अशा जगभरातील अनेक महत्त्वाच्या पदांवर अनिवासी भारतीयांचे स्थान मोलाचे राहिले आहे, असे मत महाजन यांनी व्यक्त केले.

आज अनेक राष्ट्रे आज भारताच्या बाजूने उभी राहिली आहेत याचे श्रेय तिथल्या अनिवासी भारतीयांना जाते. तेथील सिनेटरना ही मंडळी योग्य माहिती देत असल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा समिती असो किंवा काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याची प्रक्रिया असो याबाबतीत जागतिक स्तरावर भारताला पाठिंबा देण्याची भूमिका इतर राष्ट्रांकडून मांडली गेली, ती केवळ अनिवासी भारतीयांमुळेच, असेही महाजन म्हणाले.