मुंबई - डॉ. आंबेडकर मार्ग ते जे. जे. पुलाला जोडलेल्या भायखळा पुलावरून लवकरच अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे काळबादेवी आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये मालवाहून नेणाऱ्या वाहन चालकांना वळसा घालून क्रॉफर्ड मार्केटला यावे लागणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या संरंचनांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भायखळा पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश न देण्याचा सल्ला या तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये चार पूल धोकादायक असल्याचं आढळून आले होते. भायखळा, चिंचपोकळी, करिरोड आणि घाटकोपरचे पूल धोकादायक असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. या चारही पुलावरून अनेक वाहनांतून १६ टन सामान वाहून नेण्यात येत असल्याचेही आढळून आले होते. त्यामुळे या चारही पुलावरील वाहतुकीचा वेग ३० किलोमीटर पर लिमिट ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.
अवजड वाहनांसाठी भायखळा पूलवरून लवकरच प्रवेश बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 2:24 PM
काळबादेवी आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये मालवाहून नेणाऱ्या वाहन चालकांना वळसा घालून क्रॉफर्ड मार्केटला यावे लागणार
ठळक मुद्देभायखळा पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश न देण्याचा सल्ला या तज्ज्ञांनी दिला आहे. या चारही पुलावरील वाहतुकीचा वेग ३० किलोमीटर पर लिमिट ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.