गणेशोत्सव काळातील मिरवणुकांवर बंदी- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 03:04 AM2020-08-19T03:04:24+5:302020-08-19T03:04:36+5:30

नागरिकांनी अजिबात गाफिल न राहता शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Prohibition on processions during Ganeshotsav- Uddhav Thackeray | गणेशोत्सव काळातील मिरवणुकांवर बंदी- उद्धव ठाकरे

गणेशोत्सव काळातील मिरवणुकांवर बंदी- उद्धव ठाकरे

Next

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सध्याच्या उपाययोजना गणेशोत्सवाच्या काळातही कायम राहाणार असून गणपतींचे आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत. तेव्हा गणेशोत्सव आणि मोहरम हे गर्दी न करता साजरे करावेत. नागरिकांनी अजिबात गाफिल न राहता शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
गणेशोत्सव आणि राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी बैठकीत उपस्थित होते. टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. आयसीयू बेड आणि आॅक्सिजनची व्यवस्था असलेले बेड वाढवा, चाचण्या वाढवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
>आदेशात एकसारखेपणा हवा
गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एकसारखे असावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाला केली. लिक्विड आॅक्सिजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे. त्याचे दर वाढणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
>सीएसआरचा निधी मिळवा
सीएसआरचा निधी अधिकाधिक मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. राज्यात जम्बो सुविधा उभ्या करतच आहोत पण त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आहे त्या रुग्णांलयांमध्ये हा निधी खर्च करून तिथे आयसीयू बेड, आॅक्सिजनची सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केल्यास कायमस्वरूपी सुविधा म्हणून त्या उपयोगात येतील, असे अजित पवार म्हणाले.
>सोशल मीडियावर लक्ष : समाजमाध्यमांवर प्रसारित होणाºया चुकीच्या व्हिडिओंवर पोलिसांनी लक्ष ठेवावे. उत्सवकाळात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पोस्टस् समाज माध्यमांवर टाकणाºयांवर कारवाई करण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

Web Title: Prohibition on processions during Ganeshotsav- Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.