महापालिका मुख्यालयात पाण्याअभावी शौचालय वापरण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:48 AM2019-06-14T02:48:55+5:302019-06-14T02:49:13+5:30

पालिका मुख्यालयाच्या मुख्य आणि विस्तारित अशा दोन इमारती असून तेथे विविध विभागांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात.

The prohibition of using toilets for lack of water at municipal headquarters | महापालिका मुख्यालयात पाण्याअभावी शौचालय वापरण्यास मनाई

महापालिका मुख्यालयात पाण्याअभावी शौचालय वापरण्यास मनाई

Next

मुंबई : तलावांमधील जलसाठा कमी होत असल्याचा फटका महापालिका मुख्यालयालाही बसू लागला आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी टँकरद्वारे पाणी मागविण्यात येत आहे. गुरुवारी फार कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे मुख्यालयातील हजारो कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली. काही ठिकाणी तर पाणी नसल्यामुळे शौचालय वापरू नये, असे पत्रकच लावण्यात आले होते.
कुलाबा, फोर्ट या ए विभाग परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नोव्हेंबर महिन्यात चक्क मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यातील पाणी गायब झाले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापासून मुख्यालयात आवश्यकतेनुसार दोन ते तीन पाण्याचे टँकर मागविण्यात येतात. मात्र गुरुवारी मुख्यालयात कमी पाणीपुरवठा झाल्यामुळे अनेक विभागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

पालिका मुख्यालयाच्या मुख्य आणि विस्तारित अशा दोन इमारती असून तेथे विविध विभागांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी, आयुक्त कार्यालय, महापौर दालन, पक्ष कार्यालय, विविध समितींची कार्यालये आहेत. या दोन्ही इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ‘ए’ विभागातील फिलिंग पॉइंटवरून पालिकेच्याच टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गुरुवारी अपुºया पाण्यामुळे शौचालय वापरू नये, असे पत्रक लावण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

Web Title: The prohibition of using toilets for lack of water at municipal headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.