Join us

नायर रुग्णालयामधील ‘हेल्थ कार्ड’ योजनेचा प्रकल्प कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 4:26 AM

महानगरपालिकेच्या बा.य.ल नायर धर्मादाय रुग्णालयात वर्षभरापूर्वी जाहीर करण्यात आलेला ‘हेल्थ कार्ड’ योजनेचा प्रकल्प कागदावरच आहे.

- स्नेहा मोरे मुंबई : महानगरपालिकेच्या बा.य.ल नायर धर्मादाय रुग्णालयात वर्षभरापूर्वी जाहीर करण्यात आलेला ‘हेल्थ कार्ड’ योजनेचा प्रकल्प कागदावरच आहे. या प्रकल्पाची घोषणा पालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षी केली होती. या माध्यमातून रुग्णांच्या वैद्यकीय अहवाल बारकोडच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प सुरू होण्यास अडथळे येत असून, त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यास आणखी काही महिने उलटतील, अशी माहिती नायर प्रशासनाने दिली.राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या रुग्णालयांमध्ये रुग्ण येतात. त्यांना उपचारांची माहिती, नोंदी असणारे केसपेपर, वैद्यकीय अहवाल घेऊन एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जावे लागते. या धावपळीत रुग्णाच्या वैद्यकीय अहवालाची ही कागदपत्रे गहाळ होण्याचीभीती असते. त्यामुळे यावर उपाय शोधत पालिका रुग्णालयांच्या बाह्य व आंतररुग्ण विभागात उपचारासाठी येणाºया रुग्णांना आरोग्य संचयनी सेवेअंतर्गत (एचएमआयएस योजना) हेल्थ कार्ड देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता.गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी नायर रुग्णालयातील जवळपास तीन हजार कर्मचाºयांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. मुंबई शहर-उपनगरातील पालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने आणि पाच वैद्यकीय महाविद्यालयांत राबविण्यात येणाºया या प्रकल्पासाठी सुमारे ७० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, दीर्घ काळाचा विचार करून, इंटरनेटची सेवा देणाºया सीस्टिमवर काम सुरू आहे. यासाठी इंटरनेटतज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. सीस्टिमवर जमा होणाºया माहितीचा सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार सुरू आहे. हे सर्व पाहता प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आणखी काही महिने लागतील. प्रकल्पाच्या निधीतही वाढ होईल.>असा आहे प्रकल्परुग्णाच्या आजाराची माहिती हेल्थ कार्डमध्ये कायमस्वरूपी नोंदविली जाईल.पालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर या मोठ्या रुग्णालयांसह २८ प्रसूतिगृहे, १८३ हेल्थ पोस्ट, १६१ दवाखाने, पाच प्रमुख रुग्णालये, १८ उपनगरीय रुग्णालये यापैकी रुग्ण कुठेही गेल्यास, तेथील डॉक्टरांना त्याच्या आजाराची माहिती हेल्थ कार्डमुळे तत्काळ उपलब्ध होईल.प्रत्येक कार्डवर असणाºया बारकोडच्या माध्यमातून रुग्णाचा वैद्यकीय अहवाल एका क्लिकवर मिळेल. बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाºया रुग्णांना टोकन देऊन आरोग्य तपासणीची वेळ निश्चित करण्यात येईल. त्यामुळे या विभागात तपासणीसाठी लागणाºया रांगा कमी होऊन रुग्णांचा त्रास कमी होईल, शिवाय त्यांच्या वेळेचीही बचत होईल.>आरोग्य संचयनी सेवेअंतर्गत सुरू होणारा हा प्रकल्प डिजिटल असल्यामुळे त्यात गरजेनुसार सतत बदल होत आहेत. या प्रकल्पातून पालिका रुग्णालये, दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालयांच्या यंत्रणा एकमेकांशी जोडण्यात (इंटरकनेक्टेड) येतील. प्रकल्प संपूर्णत: डिजिटल असल्यामुळे अंमलबजावणीस वेळ लागत आहे.-डॉ. हेमंत देशमुख, पालिका प्रमुख रुग्णालयांचे संचालक