नवी मुंबई : खारघर सेक्टर 36 येथे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांसाठी 29 नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावरून केले जाणार असल्याने अर्जदारांना इंटरनेटवर या निकालाची ताजी माहिती मिळेल.
प्राप्त अर्जाची पारदर्शक व नि:पक्षपातीपणो सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी विविध क्षेत्रतील मान्यवरांची एक पर्यवेक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीसमोर मंगळवारी सिडको भवनमध्ये सोडत प्रक्रियेचे सादरीकरण करण्यात आले.
या समितीवर माजी जिल्हा न्यायाधीश एस.डी.धर्माधिकारी, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, नवी मुंबई स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष फादर अल्मेडा, मागासवर्गीय कक्ष अधिकारी कल्पना जगताप भोसले, आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर आणि महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य व्यवस्थापक योगेश गडकरी आदींचा समावेश आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी ही सोडत काढण्यात येईल.
अर्जदारांना सोडतीची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता यावी यासाठी या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या 666.्रूूि.ेंँं1ं2ँ31ं.
ॅ5.्रल्ल/या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.