मुंबई : मेट्रो आणि मोनो रेलची स्थानके व इतर बांधकामासाठी महापालिकेची परवानगी न घेण्याचा प्रस्ताव मंगळवारी सुधार समितीत शिवसेनेने राखून ठेवला. शिवसेनेच्या शिलेदारांना पक्षप्रमुखांकडून याबाबत कोणताच संदेश न आल्याने, हा प्रस्ताव लांबणीवर टाकल्याचे समजते. रेल्वे स्थानक, पॉवर स्टेशन, बुकिंग कार्यालय बांधण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची गरज नसते, अशी तरतूदच पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात आली आहे. यामध्ये मोनो आणि मेट्रो रेल्वेचाही समावेश करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सुधार समितीत मांडला होता. भाजपाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने पहिल्यापासून बंडाचा झेंडा फडकाविला आहे. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाकडून ही शिफारस पालिकेला केली होती.
मेट्रोला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:18 AM