भाडेकरार नूतनीकरण लांबणीवर
By admin | Published: April 26, 2017 12:43 AM2017-04-26T00:43:36+5:302017-04-26T00:43:36+5:30
वादग्रस्त ठरलेले महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्टन क्लबसाठी वेगळे धोरण आणण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. त्यामुळे या दोन मालमत्ता वगळता
मुंबई : वादग्रस्त ठरलेले महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्टन क्लबसाठी वेगळे धोरण आणण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. त्यामुळे या दोन मालमत्ता वगळता, अन्य २३६ मालमत्तांच्या भाडेकराराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने
सुधार समितीपुढे मांडला आहे.
मात्र, या प्रस्तावावर चर्चा लांबणीवर टाकत, महालक्ष्मी रेसकोर्सवर आपल्या महत्त्वाकांशी प्रकल्पासाठी विकास नियोजन आराखड्यात आरक्षण ठेवण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या आहेत.मुंबईतील भाड्याने दिलेल्या मालमत्तांचे करार संपले आहेत. मात्र, यामध्ये वेलिंग्टन क्लब आणि महालक्ष्मी रेसकोर्ससारखे काही वादग्रस्त मालमत्ताही आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न आहे. मात्र, युती तुटल्यामुळे भाजपाने सेनेच्या या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला सुरुंग लावला आहे. अशा १० मालमत्तांच्या नूतनीकरांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने २४२ मालमत्तांच्या भाडेकराराच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
या मालमत्तेचे मूळ मालक राज्य सरकार आहे. हे भूखंड महापालिकेकडे देखभालीसाठी सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे थीम पार्कच्या मार्गात राज्यातील भाजपा सरकारने अडथळे आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या वादात
अन्य मालमत्तांच्या भाडेकराराचे नूतनीकरण लाटण्याची भीती असल्याने प्रशासनाने, उर्वरित मालमत्तांचे भाडेकरार आणखी ३० वर्षे वाढवण्याचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंजुरीसाठी आणला आहे. यावर आज चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव लांबणीवर टाकून, महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचे स्वप्न विकास नियोजन आराखड्याच्या माध्यमातून साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. (प्रतिनिधी)