संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण नाही, शेतकरी नेते राजू शेट्टींची नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:47 PM2019-12-21T22:47:50+5:302019-12-21T22:48:16+5:30

सराकरने कर्जमाफीची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर पर्यंतचे थकीत  माफ करण्यात येणार आहे

The promise of complete loan waiver is not fulfilled - Raju Shetty | संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण नाही, शेतकरी नेते राजू शेट्टींची नाराजी 

संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण नाही, शेतकरी नेते राजू शेट्टींची नाराजी 

Next

मुंबई - यंदाच्या वर्षी आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या कर्जमाफीबाबत शेतकरी नेत्यांकडून काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या कर्जमाफीमुळे सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचे म्हटले आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनीही या कर्जमाफीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सराकरने कर्जमाफीची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर पर्यंतचे थकीत  माफ करण्यात येणार आहे. मात्र यामुळे ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फारसा लाभ होणार नाही. तसेच दोन लाख रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफीच्या आश्वसनाचीही पूर्तता होताना दिसत नाही आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: The promise of complete loan waiver is not fulfilled - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.