वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन पाळले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:24+5:302021-02-05T04:36:24+5:30

ऊर्जामंत्र्यांविरोधात मनसेची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाढीव वीजबिलात नागरिकांना सवलत देण्यात येईल, अशा आश्वासनांची पूर्तता न केल्याबाबत ...

The promise of concession in electricity bill has not been kept | वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन पाळले नाही

वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन पाळले नाही

googlenewsNext

ऊर्जामंत्र्यांविरोधात मनसेची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढीव वीजबिलात नागरिकांना सवलत देण्यात येईल, अशा आश्वासनांची पूर्तता न केल्याबाबत राज्याच्या ऊर्जामंत्र्यांसह ऊर्जा सचिव आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले.

वाढीव वीजबिलाबाबत याआधीही मनसेने पोस्टकार्ड आंदोलन केले होते, आता पुन्हा एकदा हाच मुद्दा घेत मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले. टाळेबंदी असताना महावितरणने वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधी पाठविले नाहीत. या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अतिरिक्त जादा बिल बेस्टकडून पाठविण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे स्रोत बंद असताना वाढीव वीजबिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत वीजबिलाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वाढीव बिलांबाबत तक्रारी मांडल्या होत्या. वीजबिलात कपात करून नागरिकांची दिवाळी गोड करू, असे दिलेले आश्वासन पाळले गेले नाही, असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

सातत्याने पाठपुरावा करूनही वीजबिलात सवलत देण्यात आली नाही. दिवाळीनंतर ऊर्जामंत्र्यांनी घुमजाव केले. वीजबिलात सवलत न देता मीटर रीडिंगनुसार बिल भरावेच लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांची एक प्रकारे आर्थिक फसवणूक केली. यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

Web Title: The promise of concession in electricity bill has not been kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.