प्रोमो प्रोड्युसरलाही ठगाने घातला गंडा

By admin | Published: December 25, 2016 03:08 AM2016-12-25T03:08:16+5:302016-12-25T03:08:16+5:30

म्हाडात स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाने नामांकित खासगी कंपनीच्या प्रोमो प्रोड्युसरलाही ८ लाखांचा गंडा घातला आहे. सचिन घाणेकर हे नामांकित

The promo producer is also fired | प्रोमो प्रोड्युसरलाही ठगाने घातला गंडा

प्रोमो प्रोड्युसरलाही ठगाने घातला गंडा

Next

मुंबई : म्हाडात स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाने नामांकित खासगी कंपनीच्या प्रोमो प्रोड्युसरलाही ८ लाखांचा गंडा घातला आहे. सचिन घाणेकर हे नामांकित खासगी कंपनीत प्रोमो प्रोड्युसर म्हणून काम करतात. घराच्या शोधात असताना १३ मे २०१५ रोजी त्यांची सीताराम खोपकर (३२)सोबत ओळख झाली. खोपकरने स्वत: समाजसेवक असल्याचे सांगून घोडपदेव येथील म्हाडा वसाहतीत घर मिळवून देतो, असे सांगितले. २५ लाखांत सौदा ठरला. ठरल्याप्रमाणे घाणेकर यांनी ८ लाख रुपये दिले. मात्र पैसे देऊनही खोपकर फ्लॅट देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे घाणेकर यांच्या लक्षात आले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार केली. (प्रतिनिधी)

Web Title: The promo producer is also fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.