मुंबई : म्हाडात स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाने नामांकित खासगी कंपनीच्या प्रोमो प्रोड्युसरलाही ८ लाखांचा गंडा घातला आहे. सचिन घाणेकर हे नामांकित खासगी कंपनीत प्रोमो प्रोड्युसर म्हणून काम करतात. घराच्या शोधात असताना १३ मे २०१५ रोजी त्यांची सीताराम खोपकर (३२)सोबत ओळख झाली. खोपकरने स्वत: समाजसेवक असल्याचे सांगून घोडपदेव येथील म्हाडा वसाहतीत घर मिळवून देतो, असे सांगितले. २५ लाखांत सौदा ठरला. ठरल्याप्रमाणे घाणेकर यांनी ८ लाख रुपये दिले. मात्र पैसे देऊनही खोपकर फ्लॅट देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे घाणेकर यांच्या लक्षात आले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार केली. (प्रतिनिधी)
प्रोमो प्रोड्युसरलाही ठगाने घातला गंडा
By admin | Published: December 25, 2016 3:08 AM